Headlines

लहान वयातच मुलांच्या डोळ्यांची तपासणी करणे अत्यंत आवश्यक:मुलांमध्ये डोळ्यांच्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे मत‎




आजच्या काळात मोबाईल, टॅब व टीव्हीचा वाढलेला वापर (स्क्रीन टाईम) आणि कमी झालेला मैदानी खेळ यामुळे मुलांमध्ये मायोपिया (जवळचा नंबर वाढणे), डोळे दुखणे, पाणी येणे, डोकेदुखी यांसारख्या तक्रारी वाढल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, या समस्या वेळेत ओळखल्या नाहीत तर मुलांच्या शिक्षणावर आणि विकासावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लहान वयातच डोळ्यांची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. लहान मुलांमध्ये वाढत्या डोळ्यांच्या समस्या लक्षात घेऊन आनंदऋषीजी नेत्रालय येथे येत्या रविवारी (दि.३ मे) मोफत तिरळेपणा उपचार व बाल नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीर सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत आनंदऋषीजी नेत्रालय, सक्कर चौक येथे होणार आहे. संथारा व्रतधारी श्रीमती पानाबाई लक्ष्मीचंदजी रूणवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अजय रूणवाल, सतिश रूणवाल, मंगला रूणवाल परिवार शिबिराचे आयोजक आहेत. या शिबिरात बाल नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. निरंजन पेहेरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी व उपचार करणार आहेत. नेत्रालयात रेटिना, कॉर्निया, ग्लुकोमा व बाल नेत्ररोग अशा सर्व सुपर-स्पेशालिटी सेवा उपलब्ध आहेत. संस्थेने आतापर्यंत १.२५ लाखांहून अधिक नेत्रशस्त्रक्रिया केल्या असून दररोज ८० ते १०० शस्त्रक्रिया केल्या जातात. येथे ५ अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, वेब कॅमेरा मॉनिटरिंग, तसेच पूर्णवेळ अ‍ॅनेस्थेटिस्ट व फिजिशियन सुविधा उपलब्ध आहेत. पात्र रुग्णांना आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत मोफत उपचार दिले जाणार आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *