Headlines

माजी विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मदत करावी:प्रवरा शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुस्मिता विखे




प्रतिनिधी|कोल्हार
प्रवरा हायस्कूल या शाळेचा माजी विद्यार्थी मेळावा शनिवारी विद्यालयात मोठ्या ‌उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रवरा शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुस्मिता विखे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्थानिक स्कूल कमिटीचेचेअरमन डॉ. भास्कर खर्डे उपस्थित होते. डॉ. सुस्मिता विखे म्हणाल्या, प्रवरा हायस्कूल ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सीबीएसईचे शिक्षण देणारी आघाडीची शाळा आहे. शाळेने नेहमीच चांगल्या निकालाची परंपरा कायम राखली आहे. माजी विद्यार्थ्यांनी इतरांना मदत करावी. देशभरातील इतर ठिकाणी कार्यरत असणाऱ्या माजी विद्यार्थी यांनी एकमेकाला कनेक्ट होऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्याबरोबर पुढे न्यावे. संस्था देश परदेशातील विविध ठिकाणी माजी विद्यार्थी मेळावे घेऊन विद्यार्थ्यांना एकमेकांशी जोडण्याचे कार्य करत आहे. डॉ. खर्डे यांनी प्रवरेचा माजी विद्यार्थी या नात्याने घडविलेल्या उत्तम संस्कारामुळे आपण जीवनात यशस्वी झाल्याचे नमूद केले. स्व. बाळासाहेब विखे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यांनी शिक्षण शेतकऱ्यांच्या दारापर्यंत नेऊन पोहोचविल्यामुळे शेतकऱ्यांची मुले आज उत्तम प्रतीचे जीवन जगत असल्याचे त्यांनी नमूद केले. संभाजी देवकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे प्राचार्य सुधीर मोरे यांनी प्रास्ताविक केले. माजी विद्यार्थ्यांनी आपले विचार प्रकट केले. याप्रसंगी अशोक असावा, आबासाहेब राऊत, सुनील शिंदे उपस्थित होते. सूत्रसंचालन जी. व्ही. तांबे यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *