- Marathi News
- National
- 9 National Highway Projects Including Wadala Sambhajinagar Highway Development Will Gain Momentum, Gadkari Reviews Nine Projects Of 527 Km In The State
नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या आणि विशेषतः मराठवाड्याच्या दळणवळण व्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. ‘वडाळा-छत्रपती संभाजीनगर’ आणि ‘छत्रपती संभाजीनगर-जालना’ या महत्त्वाच्या टप्प्यांसह राज्यातील तब्बल ५२७ किलोमीटर लांबीच्या नऊ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांना गती देण्यावर केंद्राने लक्ष केंद्रित केले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी नवी दिल्लीत घेतलेल्या विशेष आढावा बैठकीत यावर चर्चा केली.
वरील महामार्गांव्यतिरिक्त राज्यात नव्याने प्रस्तावित असलेल्या ‘हाय-स्पीड’ आणि ‘हाय-डेन्सिटी’ कॉरिडॉरचाही गडकरी यांनी आढावा घेतला. यात प्रामुख्याने नागपूर-भंडारा मार्गाचे सहापदरीकरण, तर तळोदा-बुऱ्हाणपूर मार्गाचे चार पदरीकरण करण्यावर चर्चा झाली. तसेच दुर्ग-गडचिरोली-मंचेरियल, गडचिरोली-कांकेर (रायपूर-विशाखापट्टणम) व ग्वाल्हेर-नागपूर या कॉरिडॉरच्या नियोजनाला गती देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
या नऊ प्रकल्पांवर चर्चा…
नऊ प्रकल्पांवर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये वडाळा-छत्रपती संभाजीनगर (४ पदरी) आणि छत्रपती संभाजीनगर-जालना (४ पदरी) या आपल्या भागातील प्रमुख मार्गांचा समावेश आहे. यासोबतच शिरूर-अहिल्यानगर (४ पदरी), अहिल्यानगर-वडाळा (४ पदरी), जालना-वाटूर (४ पदरी), नांदेड-नर्सी-देगलूर (४ आणि २ पदरी), जाम-वरोरा (४ पदरी), वरोरा-चंद्रपूर-बामणी (४ पदरी) आणि मलकापूर-चिखली (२ पदरी) या कॉरिडॉरचे कामही मार्गी लागणार आहे.