![]()
नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात येवला ते एरंडोल या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. मात्र, या नवीन रस्त्यावर कुठेही गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. यामुळे अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली असून, गावानजीक तातडीने गतिरोधक बसवण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. गेल्या वर्षभरापासून या रस्त्याचे काम सुरू असून, वेहळगाव ते नांदगाव उड्डाणपुलादरम्यान आतापर्यंत चार ते पाच जणांना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. नांदगाव उड्डाणपूल ते साकोरा दरम्यान अनेक धोकादायक वळणे आहेत. त्यातच नांदगाव-न्यायडोंगरीमार्गे चाळीसगाव रस्त्यावर पिंपरखेड येथे टोल असल्याने अनेक अवजड वाहने टोल वाचवण्यासाठी साकोरामार्गे येत आहेत. परिणामी, या रस्त्यावरील वर्दळ प्रचंड वाढली आहे.
Source link
येवला-एरंडोल रस्त्यावर गतिरोधकांची गरज:पादचाऱ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास