Headlines

पेहेचान प्रगती फाऊंडेशनचा 4 राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरव, महिला सक्षमीकरण, सामाजिक कार्याची‎ दखल‎




इंदूर येथे आयोजित अखिल भारतीय दिगंबर जैन महिला परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात इगतपुरीच्या ‘पेहेचान प्रगती फाऊंडेशन’ने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला जैन व प्रांतीय अध्यक्षा टीना पांड्या (मुंबई) यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या या संस्थेने चार प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावावर केले. संस्थेच्या अध्यक्षा प्रगती अजमेरा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या सामाजिक कार्य व महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांची राष्ट्रीय स्तरावर विशेष प्रशंसा करण्यात आली. या परिषदेत संस्थेला ‘सर्वोत्कृष्ट अध्यक्षा’, ‘सर्वोत्कृष्ट क्लब’, महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘महिला उत्पादन व उद्योजकता प्रोत्साहन’ कार्यासाठी विशेष सन्मान आणि इगतपुरी परिसरात केलेल्या ‘उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. तालुक्यात शिक्षण, आरोग्य, महिला विकास व सामाजिक उन्नतीसाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे फाऊंडेशनला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला असून, अनेक महिला आता उद्योजकतेकडे यशस्वी वाटचाल करत आहेत. महिलांना योग्य संधी, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळाले, तर त्या समाज परिवर्तनाची सक्षम शक्ती ठरू शकतात. हा राष्ट्रीय सन्मान आमच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचा आणि समाजाने दाखवलेल्या विश्वासाचा परिपाक असल्याचे अध्यक्षा प्रगती अजमेरा यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *