![]()
बाळापूर तालुक्यातील हातरुण ग्राम पंचायतीमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत करण्यात आलेल्या विकासकामांची समीक्षा करण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेच्या निरीक्षण समितीने भेट दिली. या भेटीदरम्यान समितीने ग्रामपंचायत कार्यालयातील ऑफलाइन व ऑनलाइन नोंदींची सखोल तपासणी केली. गावामध्ये प्रत्यक्ष राबविण्यात आलेल्या विकासकामांची पाहणी केली. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव पंचायत समितीकडून आलेल्या या निरीक्षण समितीत अध्यक्ष एच. बी. गौतम( गट विकास अधिकारी), समिती सचिव टी. डी. बिसेन ( विस्तार अधिकारी), समिती सदस्य वैशाली खोब्रागडे ( विस्तार अधिकारी सांख्यिकी), समिती सदस्य पूनम घासले आणि समिती सदस्य पत्रकार भरत घासले यांचा समावेश होता.पाहणीदरम्यान विस्तार अधिकारी गुंडेकर , विस्तार अधिकारी कृषी तथा नोडल अधिकारी नाकट , सहकारी ग्रामपंचायत अधिकारी आर. आर. इंगळे होते.सरपंच हुजैफा परवीन सय्यद काझिम अली, उपसरपंच संध्या भास्कर डोंगरे, सदस्य शेख युसूफ, ग्रामपंचायत अधिकारी योगेश तोताराम कापकर यांनी समितीचे स्वागत केले. समितीसमोर पीपीटी सादरीकरण, व्हिडिओ डॉक्युमेंट्रीद्वारे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या कामांची माहिती ग्रामपंचायतीतर्फे बुकलेटच्या माध्यमातून लेखी स्वरूपात समितीसमोर सादर करण्यात आली. याशिवाय पीपीटी सादरीकरण आणि व्हिडिओ डॉक्युमेंट्रीद्वारे विविध विकासकामांची माहिती समितीला देण्यात आली. यावेली ग्रामपंचायत सदस्य शेख युसूफ, शेख आरिफ कुरेशी, अतीक खान, वाजिद खान, गजानन जाधव, विजय पाटील, गजानन रोहणकर, दिलीप डोंगरे, जबीउल्लाह शाह, एजाज खान, साबिर खान, ग्रामपंचायत कर्मचारी, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शेख इनायत सर, नरेंद्र कुलकर्णी ,आरोग्य उपकेंद्र अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, चांद भाई वाडेगाव, सय्यद फैयाज, शेख हमीदुद्दीन, काझी मेहंदी हसन, एजाज हयात खान, शाहरुख पठाण उपस्थित होते.
Source link
प्रगती:हातरुण ग्रामपंचायतीमध्ये नोंदींसह विकासकामांची पाहणी, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत माेहिम