Headlines

कन्नडमधील मूलभूत सुविधांना गती- आमदार जाधव:प्रभागांमध्ये विकासकामांचे लोकार्पण, सर्वांना सोबत घेऊन विकासकामे करणार‎




यापूर्वी आमदार व नगराध्यक्ष वेगवेगळ्या पक्षाचे व विरोधात होते. आमदारांनी मंजूर करून आणलेल्या विकास कामांना पालिका ना हरकत प्रमाणपत्र देत नव्हती. त्यामुळे विकास खुंटला. आता नगराध्यक्ष व आमदार वेगवेगळ्या पक्षाचे पण एका विचारांचे असल्याने शहराच्या विकासाला गती आली आहे, असे प्रतिपादन आमदार संजना जाधव यांनी केले. कन्नड शहरातील प्रभाग क्रमांक १, ५, ६ व ९ मध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण झाले. यावेळी आमदार जाधव बोलत होत्या. नगराध्यक्ष फरीन बेगम, नगरसेवक अब्दुल जावेद यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. स्वच्छता, पाणी पुरवठा या रखडलेल्या प्रश्नांवर त्यांनी काम सुरू केले आहे. विकास हाच केंद्रबिंदू ठेवल्याने शहरातील विकास कामांना तत्काळ ना हरकत प्रमाणपत्र मिळत आहे. त्यामुळे शहरातील उर्वरित रखडलेल्या कामांना गती मिळणार असल्याचे आमदार जाधव म्हणाल्या. कार्यक्रमास लोकनियुक्त नगराध्यक्षा फरीन बेगम अब्दुल जावेद यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या भाषणात त्या म्हणाल्या की आमदार, नगराध्यक्ष, तहसीलदार पंचायत समिती सभापती महिला आहेत. कोणत्याही दबावाला बळी न पडता आम्ही विकास कामे करणार आहोत. विकास कामात अडथळे निर्माण करणाऱ्यांना जनता धडा शिकवते हे नगरपालिका निवडणुकीत जनतेने दाखवून दिले आहे. यावेळी अब्दुल जावेद, अयाज शाह, नगरसेवक अब्दुल तारेक, प्रकाश अग्रवाल, अहेमद अली, संदीप घोंगते, बंटी सुरे, अब्दुल अजीज, असद पवार, शहेजाद बागवान, वाल्मीक लोखंडे, संतोष पवार, भुरय्या अल्हाड, कवडे काका, राम पवार, गोकुळ राठोड,राजू शेख कमिटी, बाजीराव थोरात आदींची उपस्थिती होती. समस्यांमध्ये ठोस सुधारणा होणार ः मुख्याधिकारी रविंद्र लांडे शहरातील पायाभूत सुविधांच्या विकास कामांना सुरुवात झाली आहे. आमदार आणि नगराध्यक्षा यांच्यात सुसंवाद व समन्वय असल्याने नवीन पाणीपुरवठा योजना, भूमिगत गटार योजना आदी विकासकामे पूर्ण होणार आहेत. शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण, नाल्यांचे बांधकाम, पाणी निचरा व्यवस्थेला मजबूत करणे तसेच स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा करणे अशा महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे. विशेषतः पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या भागांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *