![]()
छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर महानगरपालिकेने मतीन पटेल यांचे घर आणि कार्यालयाला अनधिकृत बांधकामाची नोटीस बजावली होती. मात्र, ही नोटीस बेकायदेशीर असल्याचा आरोप करत एमआयएमने न्यायालयात धाव घेतली आहे. मनपा विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, नियमानुसार कोणत्याही कारवाईपूर्वी 15 दिवसांचा अवधी देणे बंधनकारक असताना केवळ 3 दिवसांची मुदत का देण्यात आली, असा थेट सवाल केला आहे. याशिवाय, मतीन पटेल यांच्यावर अद्याप कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत आणि ज्या मालमत्तेवर कारवाई केली जात आहे ती त्यांच्या मालकीची नसल्याचा दावाही समीर साजिद बिल्डर यांनी यावेळी केला. न्यायालयाकडे 15 दिवसांची मुदत मागणार नाशिक धर्मांतर प्रकरणात गुन्हा दाखल झालेले नगरसेवक मतीन पटेल यांनी महापालिकेच्या अतिक्रमण नोटीसविरोधात न्यायालयात धाव घेतली असून, पालिकेची तीन दिवसांची नोटीस बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. आपली कागदपत्रे आणि सविस्तर उत्तर सादर करण्यासाठी न्यायालयाकडे 15 दिवसांची मुदत मागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. महापालिकेचा बुलडोझर चालण्यापूर्वीच पटेल यांनी न्यायालयीन प्रक्रियेचा आधार घेतल्याने, आता या प्रकरणावर न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. व्हायरल व्हिडिओ खरा की एआय? दरम्यान, मतीन पटेल यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. यावर हा व्हिडिओ खरा आहे की एआयच्या मदतीने तयार केला आहे? असा सवाल पक्षाने उपस्थित केला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात पक्ष मतीन पटेल यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे संकेत एमआयएम पक्षाकडून देण्यात आले आहेत.
Source link
मनपाने पाठवलेली नोटीस बेकायदेशीर!:निदा खानला आश्रय देणाऱ्या मतीन पटेलची न्यायालयात धाव, 15 दिवसांची मागितली मुदत