![]()
शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव लक्षात त्यांच्या निर्बीजीकरण शस्त्रक्रियेसह श्वान दंश लसीकरणासाठी शासनाच्या निर्धारित दरापेक्षा प्राप्त कंत्राटदार संस्थेच्या कमी दराच्या निविदेला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या सभेमध्ये बहु
.
शहरातील मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव, विविध विकासकामांच्या निविदा, पाणीपुरवठा विभागातील प्रलंबित देयके तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या कामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सभेतील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.
सभेमध्ये विशेषतः मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवर सदस्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. शहरातील विविध भागांत मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकीस्वारांवर कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना घडत असल्याच्या तक्रारी सदस्यांनी सभागृहात मांडल्या. या पार्श्वभूमीवर मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरण व लसीकरण मोहिमेत गती आणण्याची आवश्यकता सभेत अधोरेखित करण्यात आली.
स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी याबाबत प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या की, संबंधित कंत्राटदार संस्थेला दररोज किमान २५ मोकाट कुत्रे पकडून त्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करणे बंधनकारक राहील, अशी अट करारामध्ये समाविष्ट करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. कामात हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. जर अपेक्षित प्रमाणात काम झाले नाही तर संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. सभेला स्थायी समितीचे सभापती विजय अग्रवाल, समिती सदस्य, अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, निवडणूक विभाग प्रमुख अनिल बिडवे, सभा सचिव अमोल डोईफोडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर, स्वच्छता विभागप्रमुख प्रशांत राजुरकर आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. उर्वरित पान ४
मनपा स्थायी समिती सभेत बोलताना सभापती विजय अग्रवाल. निर्बीजीकरणासह श्वान दंश लसीकरणासाठी संस्थेला प्रति श्वान १४८५ रुपये मोबदला देण्याची निविदा मंजूर झाली आहे. या निर्बीजीकरणात कमी कुत्र्यांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करुन जास्त दाखवण्याच्या प्रकाराला आळा बसावा, यासाठी निर्बीजीकरण केलेल्या कुत्र्यांचे कान कापावे, शस्त्रक्रिया करतानाच व्हिडिओ छायाचित्रण करण्यात येणार असल्याचे स्थायी समितीचे सभापती विजय अग्रवाल यांनी सांगितले. कंत्राटदाराने जर या कामात कुचराई केली तर प्रति श्वान दंड आकारण्यात येईल.
घंटागाडी येत नसल्याने कचऱ्याचे ढिगारे ‘वंचित’चे गटनेते तथा नगरसेवक नीलेश देव यांनी घंटागाडी सेवेत होत असलेल्या अनियमिततेकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, शहरातील अनेक भागांत तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी घंटागाडी येत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नियमित कचरा संकलन न झाल्यामुळे घरगुती कचरा रस्त्यांवर टाकला जात असून, अनेक भागांत कचऱ्याचे ढीग साचत आहेत. त्यामुळे दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढत असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.