Headlines

टाकळी पैठण ग्रा.पं. उपसरपंचपदी चंद्रहार लाटे यांची बिनविरोध निवड:गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष‎




ढोरकीन पैठण तालुक्यातील टाकळी पैठण येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी चंद्रहार लाटे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर जल्लोष साजरा केला. संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विजय गोरे, व्हा. चेअरमन आप्पासाहेब ठोंबरे, माजी सरपंच गंगाधर जाधव, सखाराम सोलाटे, माजी उपसरपंच कडुबाळ सुसे, माजी उपसरपंच रघुनाथ जाधव, भानुदास लाटे यांनी नूतन उपसरपंच चंद्रहार लाटे यांचे अभिनंदन केले. सहायक निवडणूक अधिकारी तथा ग्रामसेविका संगीता दानवे यांनी सभेचे कामकाज पाहिले. यावेळी माजी उपसरपंच कडुबाळ जाधव, निजाम शेख, चंद्रकला आसाराम ठोंबरे, कांता वाघमारे, सुरेश जाधव, आसाराम ठोंबरे, बाबूराव शिंदे, गुलाम शेख, शिवनाथ जाधव, नितीन जाधव, आप्पासाहेब जाधव, संतोष सोलाटे, मच्छिंद्र लाटे, अमोल सोलाटे, बबन निळ, किरण सोलाटे, दिगंबर घावट, दिपक लाटे, योगेश सोलाटे, रवींद्र लाटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. टाकळी पैठण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी चंद्रहार लाटे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. एकच अर्ज आल्याने चंद्रहार लाटे बिनविरोध ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पद्मा विजय गोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (१२ मे) दुपारी झालेल्या विशेष सभेत उपसरपंच निवड प्रक्रिया पार पडली. पूर्वीचे उपसरपंच कडुबाळ जाधव यांनी स्वइच्छेने पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंचपद रिक्त झाले होते. विहीत वेळेत नामांकन न आल्याने एकमात्र उमेदवार चंद्रहार लाटे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे निर्णय अधिकारी कल्पना पोकळे यांनी जाहीर केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *