![]()
पुणे येथील सिंहगड कॉलेज कॅम्पसमध्ये एका ५३ वर्षीय सुरक्षा रक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेमागे पगार न मिळाल्याचे नैराश्य हे प्राथमिक कारण असल्याचे समोर येत आहे. आत्महत्या केलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव समीर माधव दाभोळकर (वय ५३) असे आहे. ते सिंहगड कॅम्पसमधील ‘पन्हाळा हॉस्टेल’ येथे वॉचमन म्हणून कार्यरत होते. बुधवारी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी हॉस्टेलच्या आवारात गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. दाभोळकर यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने ते मानसिक तणावाखाली असल्याची चर्चा परिसरात आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू केली असून, मृताच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले जात आहेत. शैक्षणिक संस्थेच्या आवारातच सुरक्षा रक्षकाने आत्महत्या केल्याने कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रिक्षा प्रवासी महिलेचे दागिने चोरी रिक्षाचालकाने प्रवासी महिलेचे एक लाख ३४ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पिंपरी-चिंचवडमधील सांगवी भागात राहायला आहेत. त्या पुणे स्टेशन परिसरातून रिक्षाने बिबवेवाडीकडे निघाल्या होत्या. प्रवासादरम्यान रिक्षाचालकाने पिशवीत ठेवलेले मंगळसूत्र चोरून नेले, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. महिलेने फिर्यादीत रिक्षाचालकाने मंगळसूत्र चोरल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलीस हवालदार गोडसे तपास करत आहेत.
Source link
सिंहगड कॉलेज सुरक्षा रक्षकाची आत्महत्या:पगार न मिळाल्याने पन्हाळा हॉस्टेलमध्ये गळफास