Headlines

दीपनगरला ‘चाइल्ड ओबेसिटी' विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन




भारतीय युवक संस्था दिल्ली द्वारा आयोजित पाच दिवसीय मोटापा निवारण शिबिराचा चतुर्थ दिवस दीपनगर साताजीरा परिसरात उत्साहात पार पडला. या योग वर्गात एकूण ३३ साधकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटन प्रमुख वसंतराव शेजोळे होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून आहारतज्ज्ञ डॉ. अनघा संतोषजी नेवपूरकर उपस्थित होत्या. यावेळी राधा मंगल कार्यालय योग वर्गाचे विलास अहिरे, विजया कुलकर्णी आणि अहिल्यादेवी होळकर गार्डन योग वर्गाच्या प्रतिभा लांडगे, प्रतिभा लोखंडे, छाया वानखेडे व मीनल जडे या साधकांनी सेवा दिली. शामल जोशी यांनी प्रास्ताविक तर विलास अहिरे यांनी परिचय करून दिला. मीनल जडे यांनी वार्ता सादर करताना आहार-विहाराचे महत्त्व सांगितले. प्रमुख पाहुण्या डॉ. अनघा नेवपूरकर यांनी वाढती समस्या ‘चाइल्ड ओबेसिटी’ व विरुद्ध आहार यावर मार्गदर्शन केले. अध्यक्ष वसंतराव शेजोळे यांनी मन संतुलन व सहस्रार चक्र साधनेवर प्रकाश टाकला. याप्रसंगी जिल्हा मंत्री मीना पिसोळे व केंद्रप्रमुख सतीश कुमार वानखेडे यांची सक्रिय उपस्थिती होती. सूत्रसंचालन वर्षा बुगदे यांनी तर आभार सतीश कुमार वानखेडे यांनी मानले. व्यवस्थापनात सुमन नवरंगे, अर्चना बुगदे, सुनीता बेलकर, शुभांगी कुलकर्णी यांनी सहकार्य केले. आसन व्यवस्थेची जबाबदारी रमेशज जोशी, लक्ष्मण सोनवणे, प्रमोद जोशी व मुकुंद बुगदे यांनी सांभाळली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *