Headlines

Anna Hazare Reaction On Sonam Wangchuk Protest | CJP Protest | Abhijit Dipake | Dharmendra Pradhan


केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आता एक नवे वळण मिळाले आहे. गेल्या २० दिवसांपासून या संवेदनशील विषयावर मौन बाळगून असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अख

.

‘पीटीआय’ (PTI) वृत्तसंस्थेशी बोलताना अण्णा हजारे यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या घडामोडींवर तीव्र चिंता व्यक्त केली आणि प्रशासनाला सामंजस्याची भूमिका घेण्याचे आवाहन केले.

नेमके काय म्हणाले अण्णा हजारे?

अण्णा हजारे म्हणाले, “सोनम वांगचुक उपोषण करत असताना त्यांना उचलून रुग्णालयात दाखल केले गेले. सलोख्याने प्रश्न सुटत असतात. चर्चेविना प्रश्न सुटणार नाहीत. चर्चा करून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करायला हवा. सरकारने सामंजस्याने प्रश्न सोडवावेत. बळजबरी केली तर परिस्थिती बिकट होते.”

२१ व्या दिवशी पोलिसांची कारवाई; वांगचुक उपोषणावर ठाम

शनिवारी सकाळी जंतर-मंतर आंदोलन स्थळावर एक नाट्यमय घडामोड घडली. आंदोलन सुरू होऊन २१ दिवस पूर्ण झाले असताना साध्या वेषात आलेल्या दिल्ली पोलिसांनी आंदोलकांची दिशाभूल करत सोनम वांगचुक यांना बळजबरीने ताब्यात घेतले आणि दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. आंदोलकांकडून सरकारच्या या पावलावर दडपशाहीचा आरोप करत तीव्र टीका होत आहे.

रुग्णालयात दाखल केल्यानंतरही सोनम वांगचुक यांनी सरकारसमोर झुकण्यास नकार दिला आहे. “मी रुग्णालयातही कोणतेही अन्न किंवा औषधे घेणार नाही आणि माझ्या उपोषणावर ठाम राहीन,” असा संदेश त्यांनी आपल्या पत्नीच्या माध्यमातून दिला आहे. दरम्यान, सरकारच्या या भूमिकेचा निषेध करत ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांनीही आता जंतर-मंतरवर उपोषण सुरू केले आहे. या घटनेनंतर अण्णा हजारे यांनी आपली भूमिका मांडली.

अण्णा हजारेंचे विधान का मानले जातेय महत्त्वाचे?

केंद्रात काँग्रेसप्रणीत सरकार सत्तास्थानी असताना, २०११ मध्ये अण्णा हजारे यांनी लोकपाल कायद्याच्या मागणीसाठी दिल्लीत ऐतिहासिक आंदोलन केले होते. ११ दिवस चाललेल्या त्या उपोषणाची दखल तत्कालीन सरकारने घेतली होती आणि आंदोलकांशी सन्मानपूर्वक चर्चाही केली होती. मात्र, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाकडे सरकारकडून सपशेल दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून होत होता. अशा परिस्थितीत ‘अण्णा हजारे शांत का?’ असा प्रश्न उपस्थित केला जात होता, त्यामुळे अण्णांचे हे ताजे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

हे ही वाचा…

सोनम वांगचूक प्रकरणावर विरोधक आक्रमक:सरकारच्या भूमिकेवर सवाल; शरद पवार, ठाकरे, जरांगेंसह राजकीय नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान उपोषणाला बसलेले सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे. सलग २१ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर आंदोलनस्थळी मोठा गोंधळ उडाला असून देशभरातून विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.