लोहगाव पोलिस उपनिरीक्षकाला 80 हजारांची लाच घेताना अटक:गुन्ह्यात मदत करण्यासाठी वरिष्ठांच्या नावावर मागितले पैसे, एसीबीची कारवाई
लोहगाव पोलिस ठाण्यातील एका पोलिस उपनिरीक्षकाला ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. मनोज मधुकर बरुटे (वय ३८) असे अटक करण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून, या कारवाईमुळे पुणे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील तक्रारदार हे ३९ वर्षीय व्यावसायिक असून, त्यांच्याविरुद्ध लोहगाव पोलिस स्टेशनमध्ये एक अदखलपात्र गुन्हा दाखल…