Headlines

Bhaskar Jadhav Slams BJP Over Ram Mandir Theft Controversy


शिवसेना (यूबीटी) नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी राम मंदिरातील कथित चोरीच्या मुद्द्यावरून भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांवर जोरदार निशाणा साधला. मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करणारे आता राम मंदिरातील चोरीबाबत गप्प का आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित के

.

‘मातोश्री म्हणजे मशिद आहे का?’

हनुमान चालिसा आंदोलनाचा संदर्भ देताना जाधव म्हणाले की, राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर हनुमान चालिसा म्हणण्याचे आवाहन केले होते. मात्र, काही जण मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणायला गेले. “मातोश्री म्हणजे मशिद आहे का? त्यावेळी लाज वाटली नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे कोणाच्या घरासमोर जात नाहीत, तर राम मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्राची प्रार्थना करणार आहेत. त्यामुळे या आंदोलनावर आक्षेप घेण्याचे कोणतेही कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘राम मंदिरातील चोरीवर संघ-भाजपने पुढाकार घ्यावा’

राम मंदिरातील कथित चोरीचा उल्लेख करताना जाधव म्हणाले की, मंदिर उभारणीचे संपूर्ण श्रेय भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद यांनी घेतले. त्यामुळे मंदिरात चोरी झाली असल्यास त्याची चौकशी करण्यासाठीही त्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे.

“राम मंदिरात चोरी करणारे कोण आहेत, हे देशासमोर आले पाहिजे. संघ, विश्व हिंदू परिषद, भाजप आणि बजरंग दलाने यासाठी पुढाकार घ्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.

‘रामरक्षा आंदोलनात सर्व रामभक्तांनी सहभागी व्हावे’

नागपुरात होणाऱ्या रामरक्षा आंदोलनाबाबत बोलताना जाधव म्हणाले की, राम मंदिर उभारणीसाठी देशातील लाखो रामभक्तांनी योगदान दिले आहे. त्यामुळे स्वतःला रामभक्त आणि हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या प्रत्येकाने उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी व्हावे.

‘कर्जमाफी फसवी, लाडकी बहीण योजना निवडणुकीपुरती’

राज्य सरकारवर टीका करताना जाधव यांनी कर्जमाफीची घोषणा फसवी असल्याचा आरोप केला. डिजिटल वीज मीटरच्या माध्यमातून अदानी समूहाला फायदा करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही दावा त्यांनी केला. ‘लाडकी बहीण’ योजनेवरही त्यांनी टीका केली. निवडणुकीत मतांसाठी योजना आणली आणि आता लाखो महिलांना अपात्र ठरवले जात आहे. त्यामुळे ही योजना महिलांसाठी नव्हती, तर सत्तेसाठी होती, असा आरोप त्यांनी केला.

‘अधिवेशनातून जनतेच्या पदरात काहीच पडले नाही’

पावसाळी अधिवेशनावरही जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, अनेक मंत्री चर्चेच्या वेळी सभागृहात उपस्थित राहत नाहीत आणि जनतेच्या प्रश्नांवर गंभीर चर्चा होत नाही, असा आरोप त्यांनी केला. त्यांच्या मते, सरकारचे लक्ष केवळ पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्यावर होते. शेतकरी, बोगस बियाणे, कायदा-सुव्यवस्था, बेरोजगारी अशा प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आले.

‘कायदा-सुव्यवस्था रसातळाला’

राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरही त्यांनी सरकारला लक्ष्य केले. रेल्वेमधील खून, बलात्कार, चोरी आणि भ्रष्टाचाराच्या घटनांचा उल्लेख करत जाधव म्हणाले की, “महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. कोणालाही कोणाची भीती राहिलेली नाही.”

रवी राणा यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र येणार किंवा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार, अशा चर्चांबाबत विचारले असता जाधव यांनी रवी राणा यांच्या वक्तव्याला फारसे महत्त्व दिले नाही. “रवी राणा कोण आहेत? त्यांची पात्रता काय आहे? उद्धव ठाकरे काय करणार हे ते ठरवणार का?” असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

संबंधित बातमी वाचा…

‘हे रामरक्षा नव्हे, पक्षरक्षा आंदोलन!:उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनावर भाजपची सडकून टीका, म्हटले- संघ भूमीवर नाक घासून माफी मागावी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने नागपुरात पुकारलेल्या ‘रामरक्षा आंदोलना’वरून भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली आहे. हे आंदोलन म्हणजे रामाच्या भक्तीसाठी नसून केवळ आपला पक्ष आणि उरलेले नेते वाचवण्यासाठी केलेली ‘नौटंकी’ असल्याचा घणाघात त्यांनी पत्रकार परिषदेत केला. येथे वाचा संपूर्ण बातमी

रामरक्षा आंदोलनासाठी उद्धव ठाकरे नागपुरात दाखल:वांगचूक यांच्या आंदोलनावरून केंद्रावर हल्लाबोल, म्हणाले- प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी किती जणांचे बळी घेणार?

अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीत झालेल्या कथित चोरीप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. मुंबईतील दादर येथील आंदोलनानंतर आज उपराजधानी नागपुरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ‘रामरक्षा आंदोलन’ करण्यात येत आहे. नागपूरच्या रामनगर येथील राम मंदिरात दुपारी 4:00 ते 4:30च्या सुमारास हे आंदोलन पार पडणार असून या आंदोलनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

हुकूमशाही आणि दडपशाही सुरू:रामरक्षा आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठीच सोनम वांगचुक यांना उचलले; संजय राऊत यांचा आरोप

‘नीट’ पेपरफुटीच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतरमंतरवर उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना आज पोलिसांनी अचानक हटवून रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे आंदोलनस्थळी मोठा गोंधळ उडाला. या कारवाईनंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. वांगचुक यांच्यावर झालेली कारवाई ही दडपशाही असून, देशात हुकूमशाही सुरू असल्याची घणाघाती टीका राऊत यांनी केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.