Headlines

Amit Thackeray Joins NEET Protest at Jantar Mantar


दिल्लीतील जंतरमंतरवर ‘नीट’ परीक्षेतील गोंधळाविरोधात आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज स्वतः जंतरमंतरवर जाऊन आंदोलकांची भेट घेतली.

.

‘भारतीय राजकारणाच्या इतिहासातील काळा दिवस’

सोनम वांगचुक यांना मध्यरात्री पोलिसांनी उचलून नेल्याच्या घटनेवर अमित ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “हा भारतीय राजकारणाच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस आहे. आपली लोकशाही आपल्या डोळ्यांसमोर संपवली जात आहे. साध्या वेशात आलेल्या 4-5पोलिसांनी स्वतःला डॉक्टर सांगत आंदोलकांसमोर पांढरा पडदा लावला आणि वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून नेले.”

न्यायालयाच्या आदेशाचा गैरवापर

“उच्च न्यायालयाने वांगचुक यांच्या प्रकृतीची काळजी घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. उच्च न्यायालयाने तुम्हाला धक्काबुक्की करायला सांगितली होती का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हवाच’

‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहारामुळे 20 निष्पाप मुला-मुलींनी आत्महत्या केल्याचे सांगत अमित ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले. “सरकारचे कोणतेही उत्तरदायित्व उरलेले नाही. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे, ही मागणी अगदी रास्तच आहे. एवढा मोठा शास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ सलग 20 दिवस तुमच्यासमोर उपोषणाला बसला आहे, पण केंद्र सरकारकडून कुणीही त्यांच्याशी साधी चर्चा करायला किंवा त्यांची विचारपूस करायला आले नाही, ही कोणती पद्धत आहे? ज्या जनतेने तुम्हाला सत्तेत बसवले, त्यांचे ऐकणेच सरकारने बंद केले आहे,” असे ठाकरे म्हणाले.

अभिजीत दीपके यांचे आमरण उपोषण

सोनम वांगचुक यांना रुग्णालयात नेल्यानंतर आता आंदोलक अभिजीत दीपके यांनी आमरण उपोषणाची हाक दिली आहे. अमित ठाकरे यांनी जंतरमंतरवर अभिजीत दीपके यांची भेट घेऊन चर्चा केली आणि त्यांना मनसेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे हेदेखील उपस्थित होते.

देशभर आंदोलन पेटणार

“हे आंदोलन आता देशभर पेटले पाहिजे. देशात मुलांचे जीव गेले आहेत, विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्यामुळे अशा प्रकारचे मोर्चे आणि निदर्शने देशभरात व्हायला हवीत,” असे अमित ठाकरे म्हणाले. 20 तारखेच्या नियोजित संसद मोर्चाबाबत आणि महाराष्ट्रातील पुढील आंदोलनाच्या दिशेबाबत मुंबईत परतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातमी वाचा…

पोलिसांनी वांगचुक यांना 21 व्या दिवशी उचलले:साध्या वेशात जंतरमंतरवर आले आणि नेले; CJP च्या दीपकेंवर महिलेची शाईफेक

दिल्लीतील जंतर-मंतर येथे २१ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना पोलिसांनी शनिवारी सकाळी सफदरजंग रुग्णालयात नेले. साध्या वेशातील पोलीस तिथे पोहोचले, त्यांनी वांगचुक यांना एका पांढऱ्या चादरीतून उचलले आणि रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले. पोलिसांच्या या कारवाईचा आंदोलकांनी विरोध केला. यामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला. या गदारोळात ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजित दीपके यांनीही जंतर-मंतर येथे उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले, “पोलिसांनी सोनम सर यांना अपशब्द वापरले आणि बळजबरीने रुग्णालयात नेले. त्यांनी माझ्यावरही हात उचलला. आम्ही पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत.” पेपरफुटी प्रकरणाची चौकशी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी वांगचुक उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती सातत्याने खालावत चालली होती आणि त्यांचे वजन सुमारे ९.५ किलोंनी घटले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

NEET पेपरफुटीचा भडका:”ज्यांना कुटुंब नाही, त्यांना लेकरांची किंमत काय?”, वांगचुक यांना उचलल्यानंतर दीपके दाम्पत्याची पंतप्रधानांवर टीका

NEET पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला आता तीव्र भावनिक आणि राजकीय वळण लाभले आहे. ज्येष्ठ पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांना पोलिसांनी उपोषणस्थळावरून बळजबरीने हटवल्यानंतर आंदोलक कमालीचे आक्रमक झाले आहेत. या कारवाईचे तीव्र पडसाद उमटले असून, ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दीपके याने आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. दरम्यान, अभिजित यांच्या या पवित्र्यानंतर त्यांच्या आई-वडिलांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर अत्यंत शेलक्या शब्दांत घणाघाती टीका केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.