Headlines

पुणे गृहनिर्माण मंडळाच्या घरांसाठी उत्पन्न निकषात शिथिलता:मागील दोन वर्षांतील कोणत्याही एका वर्षाचे उत्पन्न ग्राह्य धरले जाईल




पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (म्हाडा) घरांसाठी उत्पन्न निकषांमध्ये शिथिलता आणली आहे. अर्जदारांच्या अडचणी लक्षात घेऊन मागील दोन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही एका वर्षाचे उत्पन्न ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील जाहिरात २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार, त्याच दिवशी दुपारी १२ वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्जदारांना उत्पन्नाचा पुरावा म्हणून तहसीलदार कार्यालयाकडून मिळालेला उत्पन्नाचा दाखला किंवा आयकर विवरणपत्र ऑनलाइन सादर करणे बंधनकारक आहे. मंडळाने सुरुवातीला आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील उत्पन्नाचा दाखला किंवा आयकर विवरणपत्र सादर करण्यास सांगितले होते. मात्र, अनेक अर्जदारांनी २०२५-२६ चे आयकर विवरणपत्र सादर केले असले तरी, ते अलीकडील कालावधीतील असल्याने आयकर विभागाकडून त्याचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी मिळण्यास उशीर होत होता. यामुळे अर्ज भरताना अर्जदारांना अडचणी येत होत्या. ही अडचण लक्षात घेऊन आता आर्थिक वर्ष २०२४-२५ आणि २०२५-२६ यापैकी कोणत्याही एका वर्षाचे उत्पन्न ग्राह्य धरले जाईल. अर्जदारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सभापती शिवाजी आढळराव पाटील यांनी केले आहे. प्रवीण भगवत यांना अनिरुद्ध देशपांडे यांच्या हस्ते ‘वासुदेव जीवनदृष्टी गौरव पुरस्कार’ प्रदान वेद वासुदेव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘वासुदेव जन्मोत्सव सोहळा २०२६’मध्ये पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल १४ फीट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण भगवत यांना कै. विनायकराव निमदेव स्मृतीप्रीत्यर्थ ‘वासुदेव जीवनदृष्टी गौरव पुरस्कार’ सिटी कॉर्पोरेशनचे एम. डी. अनिरुद्ध देशपांडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. वेद वासुदेव प्रतिष्ठानच्या वतीने प. पू. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित ‘वासुदेव जन्मोत्सव सोहळा २०२६’ भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. कर्वे रस्त्यावरील हर्षल हॉल येथे झालेल्या या सोहळ्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी वेद वासुदेव प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजित कृष्ण तुकदेव, अनिरुद्ध चिवटे, अविनाश कुळकर्णी , स्मिता घळसासी, नीलिमा चिवटे आदि मान्यवर उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *