Headlines

Admin

परसवानी कुटुंबाचा 14 दिवसांनी शोध, पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले:कर्जाला कंटाळून सोडले होते घर, भाड्याच्या फ्लॅटमध्ये वास्तव्य

नागपूरच्या धंतोली परिसरातून बेपत्ता झालेल्या परसवानी कुटुंबाचा शोध अखेर १४ दिवसांनी लागला आहे. हे कुटुंब पुण्याच्या पिंपरी-चिंचवड येथे एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. प्रचंड कर्ज आणि कर्जदारांच्या सततच्या त्रासाला कंटाळून त्यांनी नागपूर सोडल्याचे समोर आले आहे. माहितीनुसार, जितेंद्र परसवानी यांच्यावर मोठे कर्ज होते. कर्जदार पैशांसाठी त्यांच्याकडे सतत तगादा लावत होते….

Read More

साताऱ्यात पावसाचा जोर:महाबळेश्वर आणि पाटणमधील धोकादायक रस्ते वाहतुकीसाठी बंद

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत मुसळधार पाऊस पडत असून डोंगर उतारावरील माती सैल झाल्यामुळे दरड कोसळण्याची, रस्ते खचण्याची तसेच नाले व ओढ्यांना पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाबळेश्वर व पाटण तालुक्यातील काही रस्ते वाहतुकीस धोकादायक ठरत असून, नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या संरक्षणासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने खालील रस्ते वाहतुकीस धोकादायक…

Read More

चामोर्शीतील चिमुकलीवरील अत्याचार: 28 दिवसांत आरोपपत्र दाखल:गडचिरोली पोलिसांकडून जलद तपास, पीडितेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न

गडचिरोली पोलिसांनी महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये पीडितांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. चामोर्शी येथे एका ७ वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात, पोलिसांनी घटनेच्या अवघ्या १२ तासांत आरोपीला अटक केली आणि विक्रमी २८ दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या गतिमान कारवाईमुळे कायदेशीर वर्तुळात गडचिरोली पोलिसांचे विशेष कौतुक होत आहे. ही घटना…

Read More

वेरूळ लेणीच्या सौंदर्यात भर:सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर लेणी क्र. 29 वरील धबधबा प्रवाहित; VIDEO

जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर लेणी क्रमांक २९ वरील नैसर्गिक धबधबा पुन्हा जोरदारपणे प्रवाहित झाला आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे धबधबा सुरू झाल्याने लेणींचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. पावसाने उजळले लेणींचे सौंदर्य पावसाळ्यात डोंगररांगांमधून साचलेले पाणी लेणी क्रमांक 29 वरील जोगेश्वरी समोरील असलेले कुंडातून पाणी…

Read More

Manish Pauls Mother Urmil Paul Passes Away

6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दूरदर्शन होस्ट आणि अभिनेता मनीष पॉलची आई उर्मिल पॉल यांचे बुधवारी नवी दिल्ली येथे निधन झाले. त्या ७६ वर्षांच्या होत्या. मनीष पॉलच्या टीमने अधिकृत निवेदन जारी करून या दुःखद बातमीला दुजोरा दिला आहे. निवेदनात चाहत्यांना दिवंगत आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, कुटुंबाकडून त्यांच्या मृत्यूच्या कारणांचा अद्याप खुलासा…

Read More

नांदेड पोलिसांची धडक कारवाई:सराईत चोरट्याकडून 15 दुचाकी जप्त, 6 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

नांदेड शहर व जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांचा छडा लावत शिवाजीनगर पोलिसांनी सराईत चोरट्याला अटक करून त्याच्याकडून चोरीच्या १५ दुचाकी जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची एकूण किंमत सुमारे ६ लाख ६२ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव व उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर बैजने…

Read More

2027 मध्ये NEET परीक्षा 6 दिवस चालेल, संगणकावर आधारित असेल:1000 पेक्षा जास्त परीक्षा केंद्रे तयार केली जातील, पेपरफुटीच्या वादळानंतर बदलाची तयारी

देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG 2027 मध्ये किमान सहा दिवस चालेल. ही पूर्णपणे संगणक-आधारित चाचणी (CBT) पद्धतीने घेतली जाईल. परीक्षेसाठी देशभरात 1 हजारहून अधिक परीक्षा केंद्रे तयार केली जातील. NEET पेपरफुटीच्या वादामुळे हे बदल केले जात आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) दरवर्षी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी NEET आयोजित करते. आतापर्यंत ही परीक्षा पेन-पेपर पद्धतीने…

Read More

कांदा-टोमॅटोचे दर वाढले, जूनमध्ये व्हेज थाळी 5% महाग:नॉनव्हेज-थाळीच्या किमतीतही वाढ, हवामानामुळे डाळींचे दर वाढतील

घरी तयार होणाऱ्या व्हेज थाळीची देशभरात सरासरी किंमत 5% वाढली आहे. रेटिंग एजन्सी क्रिसिलने आपल्या राईस रोटी रेट (RRR) मध्ये सांगितले की, जून 2026 मध्ये टोमॅटो, कांदा, खाद्यतेल आणि स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर महाग झाल्यामुळे थाळीची किंमत वाढली आहे. यामुळे बटाट्याच्या किमतीतील घसरणीचा परिणामही संपुष्टात आला. एजन्सीनुसार, चिकनचा पुरवठा कमी झाल्यामुळे नॉन-व्हेज थाळीची किंमतही जूनमध्ये 6%…

Read More

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय:पालघरला 'रेड' तर मुंबईसह कोकणाला 'ऑरेंज' अलर्ट; कोणत्या जिल्ह्यात कसा असणार पाऊस? जाणून घ्या

राज्यात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढला असून, येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या विविध भागांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुढील पाच दिवसांचा सविस्तर अंदाज जाहीर केला असून, विशेषतः कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह अनेक जिल्ह्यांसाठी प्रशासनाकडून विविध स्तरांचे अलर्ट जारी करण्यात आले आहेत. कोकणात पावसाचा जोर…

Read More

हिंगोली जिल्हा परिषदेचा गतीमान कारभार:अवघ्या 20 मिनिटांत 23 शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती

हिंगोली जिल्हा परिषदेच्या गतीमान प्रशासनाचा पुन्हा एकदा शिक्षकांना अनुभव आला असून बुधवारी ता. ८ मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या उपस्थितीत अवघ्या २० मिनीटात २३ शिक्षकांना उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. यावेळी सेनगाव तालुक्यातील सर्वच रिक्तजागा भरण्यात आल्या असून समुपदेशनामुळे शिक्षकांनीही समाधान व्यक्त केले आहे. हिंगोली जिल्हा परिषदेत मागील अनेकवर्षापासून प्रलंबित असलेली कर्मचाऱ्यांची प्रकरणे…

Read More