पालघरमधील त्या दोन मृत्यूंचा उलगडा:अपघातात मित्राचा मृत्यू झाल्याचे पाहून जखमी मित्रानेही संपवली जीवनयात्रा, परिसरात खळबळ
पालघरमधील नानिवली येथे आज पहाटे दोन मित्रांचे मृतदेह आढळल्याच्या धक्कादायक घटनेचा उलगडा झाला असून सीसीटीव्ही फुटेजमधून या भीषण अपघाताचे वास्तव समोर आले आहे. भरधाव वेगातील दुचाकी आधी इलेक्ट्रिक सोलर पोलला आणि नंतर थेट झाडावर आदळल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अपघाताच्या या भीषण धक्क्यातून सावरू न शकलेल्या दुसऱ्या जखमी मित्राने शेजारीच असलेल्या झाडाला गळफास…