1.40 कोटींची ऑनलाईन फसवणूक:पुणे सायबर पोलिसांकडून सातारा येथून एकाला अटक
शेअर ट्रेडिंगमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १ कोटी ४० लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी पुणे शहर सायबर पोलिसांनी एका आरोपीला सातारा येथून अटक केली आहे. सुशांत हनमंत निकम (वय ३८, रा. अपशिंगे, ता. जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात, आरोपींनी फिर्यादीशी व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधला होता. त्यांना ‘तायकुन कॉईन कंपनी’ मार्फत…