चारधाम यात्रेसाठी गेलेल्या चोपड्याच्या महिलेचे उत्तराखंडमध्ये दुर्दैवी निधन:बद्रीनाथच्या उंबरठ्यावर मृत्यू; बोरोले कुटुंबावर मोठा आघात
चारधाम यात्रेसाठी गेलेल्या चोपडा येथील प्रतिभा नारायण बोरोले यांचे उत्तराखंडमध्ये दुर्दैवी निधन झाले. बद्रीनाथचे दर्शन होण्याच्या आदल्या दिवशीच त्यांची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चोपडा शहरातील पंकज नगर परिसरात राहणाऱ्या प्रतिभा बोरोले (वय 59) या धार्मिक भावनेतून चारधाम यात्रेला गेल्या होत्या. त्यांच्या सोबत चोपड्यातील एकूण 16 भाविकांचा गट होता. यात्रेदरम्यान सर्वांनी केदारनाथ,…