Headlines

Admin

‘ना सेंट्रली डायरेक्ट, ना रिमोट कंट्रोल’:राम मंदिर वादाच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांचे वक्तव्य

समाजात अनेक संघटना असून उपक्रम सुरू आहेत. या सर्व संघटनांचे संचालन संघच करतो, संघ त्यांना “सेंट्रली डायरेक्ट’ किंवा “रिमोटली कंट्रोल’ करतो, असा लोकांचा मोठा गैरसमज आहे. पण संघ कार्याच्या रचनेत असे अजिबात होत नाही, असे ठाम प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. अयोध्येतील राम मंदिरात पैसे आणि दागदागिन्यांची चोरी झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे….

Read More

मृताच्या नावाने घेतलेले कर्ज मंजूर; 8 दिवसांत चौकशी:साताऱ्यात सहायक व जिल्हा उपनिबंधक निलंबित

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील महाबळेश्वरवाडी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे चक्क मृत व्यक्तींच्या नावाने कर्ज मंजूर करून बनावट स्वाक्षऱ्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा कथित प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची पुढील सात दिवसांत सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे कडक निर्देश गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी…

Read More

नाशिक कुंभमेळ्याच्या रस्ते कामांत हजारो कोटींचा घोटाळा- अनिल परब:दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा

नाशिकमधील २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रस्ते विकासकामांमध्ये सरकारी नियम धाब्यावर बसवून अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांची ‘रिंग’ तयार केली असून यात हजारो कोटी रुपयांचा मोठा भ्रष्टाचार झाला आहे. तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र लुटत आहात, पण किमान देवाला तरी सोडा, असा घणाघाती आरोप शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब यांनी केला. विधान परिषदेत नियम २६० च्या प्रस्तावावर बोलताना त्यांनी पुराव्यांसह…

Read More

आग्रा येथे पतीची हत्या करून बाथरूममध्ये पुरले:मिस्त्रीला बोलावून टाईल्स लावल्या, 45 दिवस लोकांना सांगत राहिली पती बेपत्ता

आग्रा येथे पत्नीने पतीची हत्या करून मृतदेह घरातील बाथरूममध्येच पुरला. कोणालाही याची माहिती मिळू नये म्हणून बाथरूममध्ये फरशा बसवल्या. 45 दिवस तिने लोकांना सांगितले की, पती बेपत्ता आहे. शुक्रवारी दुपारी 12 वाजता पोलिस पडताळणीसाठी पोहोचले तेव्हा पत्नी घाबरली. चौकशीत तिने गुन्हा कबूल केला. पत्नीने सांगितले की, हत्येनंतर मी मृतदेहावर माती टाकून प्लास्टर केले होते. दीड…

Read More

Indian Armys Hi-Tech Upgrade: Akash Trango, Kamikaze Drones Incluson

Marathi News National Indian Armys Hi Tech Upgrade: Akash Trango, Kamikaze Drones Incluson | ₹52000 Cr Deal नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी संरक्षण अधिग्रहण परिषद (DAC) ची बैठक झाली. यामध्ये भारतीय लष्कराची युद्धक्षमता वाढवण्यासाठी सुमारे 52,000 कोटी रुपयांच्या खरेदी प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावांमध्ये लष्कर, नौदल आणि…

Read More

छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेसाठी शनिवारी मतदान:12 जागांसाठी 31 उमेदवार रिंगणात, शुक्रवारी भेटीगाठींवर भर

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (KDCC) अत्यंत चुरशीची निवडणूक शनिवारी पार पडत आहे. जिल्ह्याच्या राजकीय आणि आर्थिक सत्ताकेंद्राचे महत्त्व असलेल्या या निवडणुकीत एकूण १०५३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. बँकेच्या एकूण २० जागांपैकी ८ संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित १२ जागांसाठी ३१ उमेदवार रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. यामुळे निवडणुकीत मोठी…

Read More

घाटीत 9 कलमी कार्यक्रम मंजूर:निवासी डॉक्टरांना 8 तासांची ड्युटी, वर्ग 3 कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) निवासी डॉक्टरांना आता केवळ आठ तासांची ड्युटी देण्यात येणार आहे. तसेच, वर्ग ३ कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. रुग्णसेवा आणि प्रशासनात सुधारणा करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या एका मॅरेथॉन बैठकीत हा ९ कलमी कार्यक्रम मंजूर करण्यात आला. ही बैठक पहिल्यांदाच घाटीबाहेर शासकीय कर्करोग रुग्णालयात पार…

Read More

हरिद्वारच्या व्हीआयपी घाटावर अश्लील नृत्य, व्हिडिओ:किसान महाकुंभात डान्सरने लावले ठुमके, धार्मिक संघटनांचा आक्षेप

धर्मनगरी हरिद्वारमध्ये हर की पैडीसमोर असलेल्या व्हीआयपी घाटावर भारतीय किसान युनियन क्रांतीच्या किसान महाकुंभातून महिला नृत्यांगनेने फिल्मी गाण्यांवर नृत्य केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये काही लोक नृत्यांगनेवर नोटा उडवताना आणि स्टेजसमोर नाचतानाही दिसत आहेत. यामुळे धार्मिक प्रतिष्ठा आणि सांस्कृतिक मर्यादांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर स्थानिक लोकांनी आणि धार्मिक संघटनांनी यावर आक्षेप…

Read More

अखिलेश यांचा वाढदिवस साजरा केल्याबद्दल मुख्याध्यापक निलंबित:सपा आमदार म्हणाले- भाजप खासदाराने शाळेत 'म' वरून मोदी शिकवले, कारवाई का नाही झाली

कानपूरमधील सरकारी शाळेत सपा प्रमुख अखिलेश यादव यांचा वाढदिवस साजरा केल्याबद्दल मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आले. खरं तर, 1 जुलै रोजी सपा आमदार अमिताभ बाजपेयी परमट प्राथमिक शाळेत पोहोचले होते. त्यांनी केक कापून मुलांसोबत अखिलेश यांचा वाढदिवस साजरा केला होता. याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर 2 जुलै रोजी बेसिक शिक्षण अधिकारी (BSA) यांनी मुख्याध्यापक नवीन कुमार त्रिपाठी…

Read More

'क्रेडाई'चे 100 ट्रॅफिक वॉर्डन पुण्यात तैनात:वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे पोलिसांसोबत सामंजस्य करार

पुणे शहर वाहतूक पोलिस आणि बांधकाम व्यावसायिकांची शिखर संस्था ‘क्रेडाई पुणे’ यांच्यात वाहतूक व्यवस्था प्रभावी, सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार, ‘क्रेडाई पुणे’ने पुणे शहर वाहतूक पोलिसांना आगामी तीन महिन्यांसाठी १०० ट्रॅफिक वॉर्डन उपलब्ध करून दिले आहेत. पुण्यात सध्या सुरू असलेला पावसाळा, आगामी संत तुकाराम महाराज व संत…

Read More