जीवघेण्या हल्ल्यातील आरोपींना अटक न झाल्याने रस्ता रोको:माळीबाभूळगाव ग्रामस्थांचे उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन
माळीबाभूळगाव येथील युवकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी बुधवारी पाथर्डी–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर माळीबाभूळगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. माळीबाभूळगाव येथील रहिवासी अक्षय रमेश भडके यांच्यावर २९ मे रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात…