Headlines

शालेय स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाची पंचसूत्री:महासमादेशक अनिल कुंभार यांचे आवाहन‎




विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा, शिस्त, आपत्ती व्यवस्थापन आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक बळकट करण्यासाठी आरएसपी व सिव्हिल डिफेन्सचे प्रशिक्षण शालेय स्तरावर प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन राज्य महासमादेशक अनिल कुंभार यांनी केले. जळगाव येथील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आयोजित रस्ता सुरक्षा दल (आरएसपी) आणि नागरी संरक्षण (सिव्हिल डिफेन्स) विषयावरील एकदिवसीय प्रशिक्षण शिबिरात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण ऑर्गनायझेशन (कोल्हापूर कार्यक्षेत्र), महाराष्ट्र राज्य पोलिस आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन केले होते. प्रमुख पाहुणे म्हणून शहर वाहतूक शाखेचे मोरेश्वर पेंदाम उपस्थित होते. प्रा. ईश्वर जाधव, विभागीय समादेशक डॉ. प्रदीप साखरे, डॉ. संजय निकम वशिक्षक पतपेढीचे अध्यक्ष शैलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात जिल्ह्यातील विविध शाळांमधील सुमारे ६० प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. का. ऊ. कोल्हे विद्यालयाच्या आरएसपी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पथसंचलनाचे प्रात्यक्षिक सादर केले. शिक्षकांना धडे शिबिरात राज्य संघटनेच्या नियमावलीनुसार जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये पथसंचलन, वाहतूक नियंत्रण, अग्निशमन, पर्यावरण संरक्षण आणि प्रथमोपचार या पंचसूत्री कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत शिक्षकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *