Headlines

चारी नसल्याने सांडपाणी तुंबले; आडगाव बुद्रुक येथे ग्रामस्थांचे पाण्यात आंदोलन:ग्रामस्थ संतप्त; प्रशासनाने दखल घेताच तात्काळ कामाला सुरुवात‎




तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आडगाव ते मालोदेवाडीदरम्यान रस्त्याचे काम करण्यात आले आहे. मात्र, आडगाव खुर्द भागात या रस्त्याची उंची प्रमाणापेक्षा जास्त वाढल्याने गावातील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, गावातील मुख्य रस्त्यावर गुडघाभर पाणी तुंबल्याने नागरिकांना तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी आडगाव खुर्द येथील ग्रामस्थांनी थेट तुंबलेल्या पाण्यात बसून अर्धनग्न अवस्थेत अनोखे आंदोलन केले. रस्त्यावरील पाणी थेट लगतच्या शाळेच्या आवारात तसेच वर्गात शिरत असल्याने लहान मुलांना शाळेत जाणे कठीण झाले आहे. त्यातच, हे दूषित पाणी पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळत असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांसह शाळकरी मुलांनीही या पाण्यात बसून उपोषणाला सुरुवात केली होती. जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत मागे न हटण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला होता. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी तात्काळ योग्य सुविधा करण्याचे लेखी आश्वासन देत त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलल्याने गावकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. नियोजनाअभावी ग्रामस्थांची गैरसोय तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे होत असली, तरी अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या बेजबाबदार कारभारामुळे तालुक्यात संबंधित अधिकाऱ्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पाणी तुंबल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुषित पाण्यामुळे साथीचे आजार वाढण्याची शक्यता आहे. लेखी आश्वासन देताच आंदोलन मागे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ आंदोलनाची दखल घेतली. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी तात्काळ योग्य सुविधा करण्याचे लेखी आश्वासन देत त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलल्याने गावकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *