![]()
कृषी दिनानिमित्त ‘रावे’ कार्यक्रमांतर्गत शनैश्वर माध्यमिक विद्यालय शनिशिंगणापूर येथे विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी व विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक शेती, शेतकऱ्यांचे योगदान आणि शाश्वत कृषी पद्धतींबाबत जागरूकता निर्माण केली. का
.
यावेळी विद्यार्थ्यांनी कृषीदिंडीचे आयोजन करून कृषीविषयक घोषवाक्ये, माहितीपर फलक, शेतकरी संवाद तसेच विविध कृषी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविली. या उपक्रमात कृषीकन्या भूमिका घुगे, प्रतिक्षा मोरे, श्रद्धा गोंदकर, साक्षी नागरे, धनश्री आत्राम आणि वैष्णवी घाटगे यांनी सहभाग नोंदविला. उपस्थित शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या जनजागृतीपर उपक्रमांचे कौतुक करत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती उत्पादन वाढविण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. शेतीत येत असलेल्या नवीन तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. शेत जमिनीत खतांची मात्रा किती असावी, शेत जमिनीतील विविध घटकांची तपासणी करण्यासाठी मृदा परीक्षण कसे करावे याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच रासायनिक खतांच्या तुलनेत सेंद्रीय शेती हीच काळाची खरी गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थी आणि शेतकरी यांच्यात ज्ञानाची प्रभावी देवाणघेवाण होऊन आधुनिक, शाश्वत आणि पर्यावरणपूरक शेतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचला. कृषी दिनानिमित्त अन्नदात्या शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शेतीच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प करण्यात आला. “समृद्ध शेतकरी – समृद्ध महाराष्ट्र” हा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
यावेळी गावातील नागरिकांंनी या जनजागृतीपर उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी शनैश्वर विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.