‘महारेल’कडे ‘आरओबी’चे काम दिल्यास पुनर्बांधणीत विलंबाची शंका:पावसाळी अधिवेशनात आ. संजय खोडके यांनी उपस्थित केला मुद्दा
शहरातील राजकमल रेल्वे उड्डाणपुलाच्या (आरओबी) पुनर्बांधणीचे काम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (महारेल) कडे हस्तांतरित केल्यास सर्व तांत्रिक मान्यता आणि प्रशासकीय प्रक्रिया नव्याने कराव्या लागतील. त्यामुळे प्रकल्पाला मोठा विलंब होऊन काम रखडण्याची शक्यता असल्याचा मुद्दा विधान परिषद आमदार संजय खोडके यांनी पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला. मागील दहा महिन्यांपासून धोकादायक ठरलेल्या रेल्वे उड्डाणपुलावरून सर्व प्रकारची वाहतूक…