Headlines

मोशी कचरा डेपो दुर्घटना:9 जणांचे बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग! मुख्य अभियंत्यासह दोन बडे अधिकारी निलंबित




पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपोतील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीच्या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाने जबाबदारी निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांना निलंबित करण्यात आले असून, अग्निशमन विभागाचे अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांच्याविरुद्धही निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशासकीय इमारतीला मंजूर आराखडा आणि प्रत्यक्ष उभारलेल्या बांधकामात मोठी तफावत होती. तळमजल्यालाच परवानगी असताना प्रत्यक्षात दोन अतिरिक्त मजले उभारण्यात आले. मात्र, या विसंगतीची प्रत्यक्ष पाहणी किंवा पडताळणी न करता अंतिम फायर एनओसी देण्यात आल्याचा प्राथमिक निष्कर्ष समोर आला आहे. सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच इमारत कोसळली प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच ही इमारत कोसळून नऊ कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी अग्निशमन विभागाचे अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यांनी खुलासा सादर केला असला तरी तो समाधानकारक नसल्याचे प्रशासनाचे मत असून, त्यांच्याविरुद्ध निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सर्व जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी दरम्यान, या प्रकरणात बांधकाम परवानगी विभाग, अतिक्रमण विरोधी विभाग, संबंधित बीट निरीक्षक तसेच इमारतीचे ठेकेदार, वास्तुविशारद आणि सल्लागार यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे या दुर्घटनेतील सर्व जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे. मोशी कचरा डेपो दुर्घटना: 84 तासांची बचावमोहीम दरम्यान, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी घडलेल्या भीषण दुर्घटनेतील शोध आणि बचावकार्य सलग ८४ तासांनंतर पूर्ण झाले होते. या घटनेत एकूण ९ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. तसेच या घटनेस जबाबदार धरून संबंधित ठेकेदार कंपनी आणि पर्यावरण विभागाला नोटीस बजावून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते.
हेही वाचा.. ‘NEET’ फेरपरीक्षेचाही पेपर फुटला?:आमदार रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, गुजरातमधून 3 दिवस आधीच पेपर फुटल्याचा दावा देशात सध्या पेपरफुटीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, यातच आता आमदार रोहित पवार यांनी ‘नीट’ परीक्षेबाबत एक अत्यंत खळबळजनक आरोप केला आहे. ‘नीट’चा पेपर फुटल्यानंतर जी फेरपरीक्षा घेण्यात आली होती, तिचा पेपरही परीक्षेच्या तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटल्याचा दावा पवार यांनी एका ट्विटद्वारे केला आहे. जर ही गोष्ट खरोखरच सत्य असेल, तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने ही अत्यंत चिंताजनक आणि गंभीर बाब असल्याचेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. सविस्तर वाचा पुणे विद्यापीठात 3 लाखांत डिग्री?: हा सावित्रीबाई फुलेंच्या नावाचा अवमान, रोहित पवारांचा घणाघात; राज्यपालांकडे चौकशीची मागणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काही कर्मचाऱ्यांकडून लाखो रुपयांच्या मोबदल्यात बोगस पदव्या दिल्या जात असल्याच्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. शिक्षणाच्या क्षेत्रासाठी हा अत्यंत धक्कादायक प्रकार असल्याचे सांगत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *