Headlines

Navnath Ban Slams Sanjay Raut & Rohit Pawar Over Mughal History Row


मुघलांचा आणि अब्दालीचा इतिहास अभ्यासक्रमातून हटवण्यात आला आहे यामुळेच राऊतांचे पोट दुखत आहे. आपल्या आकांचा इतिहास पुस्तकांमधून हटवला याचा राग संजय राऊत यांच्यासह त्यांच्या लोकांना झाला आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांचा इतिहास शिक

.

नवनाथ बन म्हणाले की, शिक्षणाच्या आयचा घो असे ट्विट करणाऱ्या संजय राऊत यांच्या पक्षाच घो घो झाला आहे. महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला चलेजाव असे सांगितले आहे. तुमच्या पक्षाची काय अवस्था झाली आहे याकडे राऊतांनी लक्ष दिले पाहिजे. महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था मजबूत होती, सक्षम आहे आणि राहणार. राज्यात दर्जेदार शिक्षण मिळत आहे, उगाच राजकारणासाठी महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेची बदनामी करू नका.

मविआकडून अफवा पसरवण्याचे काम सुरू

नवनाथ बन म्हणाले की, रोज उठून पेपरफुटी होते अशा अफवा पसरवण्याचे काम रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ, संजय राऊत करत आहेत, एकही पुरावा नसताना तिघांकडून केवळ आरोप करण्यात येत आहे. सरकार खंबीर आहे, महाराष्ट्रात कुठेही पेपरफुटी झालेली नाही. काल देखील एमपीएसीने स्पष्टीकरण दिल्यावर रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ गप्प बसले. सपकाळ यांच्याविरोधात आमचे आमदार अभिमन्यू पवार यांनी तक्रार दाखल केली आहे. राऊतांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

पेपरफुटी प्रकरणी पुरावा द्यावा

नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत आणि हर्षवर्धन सपकाळ यांचे आका हे राहुल गांधी आहेत. रोज पेपरफुटी प्रकरणी खोटे बोलण्याचे काम हर्षवर्धन सपकाळ करत आहेत ते जनरल लायरच्या भूमिकेत आहेत. रोज उठायचे आणि खोटे बोलण्याचे काम ते करत आहे. पंजाब, कर्नाटकमध्ये पेपरफुटी झाली त्यांच्यावर काय कारवाई केली असा सवाल सपकाळ यांनी राहुल गांधी यांना विचारावा. सपकाळ यांनी पेपरफुटी प्रकरणी एक तरी पुरावा द्यावा, असेही बन यांनी म्हटले आहे.

हे ही वृत्त वाचा

राज्यात 2 हजार शाळा बंद, पेपरफुटी सुरूच:शिक्षण व्यवस्थेवरून संजय राऊतांचा मोदी-शहांसह राज्य सरकारवर हल्लाबोल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. “महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था पूर्णपणे रसातळाला गेली असून, राज्यात बोगस डिग्रीचा मोठा स्कॅम सुरू आहे,” असा आरोप राऊत यांनी केला आहे. पेपरफुटी, नवीन शाळांच्या मंजुरीतील भ्रष्टाचार आणि शिक्षकांना लावली जाणारी अवांतर कामे यावरून त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. तसेच, न्याय मागणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांना राज्याचे मुख्यमंत्री शिव्या घालत असल्याचा गंभीर दावाही त्यांनी यावेळी केला. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.