जिल्हा परिषदेत कर्मचारी संघटनेने उघडली पाणपोई:सीईओ सत्यम गांधी यांच्या हस्ते उद्घटन, ग्रामीण जनतेला शुद्ध व थंड पाणी उपलब्ध होणार
ग्रामीण भागातून अमरावती जिल्हा परिषदेत विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणपोईचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या या पाणपोईचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी करण्यात आले. हा उपक्रम जिल्हा परिषद कर्मचारी युनियन आणि महाराष्ट्र राज्य लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेतर्फे आयोजित करण्यात आला आहे. या…