![]()
शहरातील सातारा परिसरातील म्हाडा कॉलनी भागात शुक्रवारी (१९ जून) भरदुपारी गुंडांनी पिस्तूल आणि कोयते घेऊन तरुणांवर प्राणघातक हल्ला केला. विशेष म्हणजे, सातारा पोलिस ठाण्यासमोरून राजरोसपणे हा थरारक पाठलाग झाला.
.
याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी संघपाल वाटोडे आणि हर्षवर्धन प्रमोद इंगोले यांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. एका अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
असा घडला थरार…
फिर्यादी सुमीत प्रदीप घोडके (१९,रा. म्हाडा कॉलनी) हा शुक्रवारीदुपारी दीड वाजेच्या सुमारास मित्र बालाजी जाधव आणि अक्षयराजगुरू यांच्यासोबत दुचाकीवरून बिर्याणी खाण्यासाठी निघाला होता. हायकोर्ट कॉलनी परिसरातीलनाल्यापाशी आधीच दबा धरूनबसलेल्या गुंडांनी त्यांना गाठले.मागील शिवजयंतीच्या उत्सवात नाचून दिल्याचा जुना राग मनात धरून आरोपी व त्यांच्या ५-६ साथीदारांनी शिवीगाळ सुरू केली. आरोपींच्याहातात चाकू, कोयते आणि पिस्तूलपाहून सुमीत व त्याच्या मित्रांनी दुचाकीवरून सुसाट पळ काढला.
थेट पोलिस ठाण्यासमोरून पाठलाग
गुन्हेगारांना कायद्याचा कोणताही धाकनसल्याचे या घटनेतून समोर आले. आरोपींनीसातारा पोलिस ठाण्यासमोरून या तरुणांचाम्हाडा कॉलनी, होळकर चौकापर्यंत थरारकपाठलाग केला. सुमीतने धावत्या गाडीवरूनचमोठा भाऊ प्रशांत याला फोन करून गुंडशस्त्रांसह मागे लागल्याची माहिती दिली. सुमीतम्हाडा कॉलनीत पोहोचताच आरोपी तिथेधडकले. एका अल्पवयीन आरोपीने प्रशांतघोडके याच्यावर जिवे मारण्याच्या उद्देशानेकोयत्याने थेट वार केला. प्रशांतने डावा हातमध्ये घातल्याने त्याचा जीव वाचला. मात्रहाताच्या पंजाला गंभीर दुखापत झाली.
कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे
भरदिवसा आणि तेही पोलिस ठाण्यासमोरून गुंड हातात पिस्तूल आणि तलवारी घेऊन तरुणांचा पाठलाग करतात. ही बाब पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. या घटनेमुळे सातारा आणि म्हाडा कॉलनी परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. गुन्हेगारांचे मनोबल इतके कसे वाढले, हा खरा चिंतेचा विषय आहे.
दोघांच्या झटापटीत पिस्तूल पडले खाली
या झटापटीत मुख्य आरोपी संघपाल वाटोडे याने सुमीतवर गोळी झाडण्यासाठी आपले पिस्तूल लोड केले. मात्र सुदैवाने ते पिस्तूल त्याच्या हातातून खाली पडले. सुमीतच्या मित्रांनी धाडस दाखवून संघपालला पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्याने कमरेचा चाकू काढून दहशत निर्माण केली. ‘कोणालाही जिवंत सोडणार नाही”, अशी धमकी देत सर्व आरोपी पसार झाले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे करत आहेत.
दिव्य मराठी प्रश्न
१. पिस्तूल आले कुठून?
शहरातील किरकोळ गुंडांच्या हातातथेट गावठी पिस्तूल पोहोचत आहेत.या शस्त्रांच्या तस्करीचे धागेदोरेकुठपर्यंत जोडले आहेत?
२. पोलिसांची गस्त कुठे होती?
भरदुपारी शहरात राजरोसपणेधारदार शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या याटोळक्याची पोलिसांकडून साधीचौकशीही कशी झाली नाही?
३. डोळेझाक का? हा जीवघेणाथरार आणि पाठलाग तब्बल २ ते ३किलोमीटरपर्यंत सुरू होता. तरीहीवाटेत एकाही पोलिसांनी त्यांना कसेअडवले नाही?