Headlines

Admin

चिमुकलीला पत्र्याच्या शेडमध्ये नेत असताना फटीतून पाहिले:आम्हाला बघून त्याने दगड मारले, नसरापूर प्रकरणी तीन मुलांची महत्त्वाची साक्ष

पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी सध्या न्यायालयात सुनावणी सुरू असून, आरोपीवर दोषनिश्चिती करण्यात आली आहे. या खटल्यात एक अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली असून, घटनेच्या वेळी आरोपीला पीडित चिमुकलीसोबत पत्र्याच्या शेडमध्ये जाताना पाहणाऱ्या तीन मुलांनी न्यायालयात निर्भीडपणे आपली साक्ष नोंदवली आहे. विशेष म्हणजे, या धाडसी मुलांनी येरवडा कारागृहात झालेल्या ओळख…

Read More

डी.के. शिवकुमार आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बनतील, सायंकाळी 4 वाजता शपथ:मंत्र्यांच्या नावांची यादीही जाहीर होईल; सिद्धारामय्या काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य झाले

डीके शिवकुमार आज कर्नाटकचे 24 वे मुख्यमंत्री बनतील. मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा सायंकाळी 4 वाजता बेंगळुरू येथील लोक भवनात होईल. शिवकुमार यांची 30 मे रोजी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली होती. ते सिद्धरामय्या यांच्या जागी राज्याची सूत्रे हाती घेतील. शिवकुमार यांनी मंगळवारी सांगितले की, काँग्रेस हायकमांड नवीन मंत्रिमंडळात समाविष्ट होणाऱ्या मंत्र्यांची यादी बुधवारी…

Read More

गांधी ग्राम येथे कावड पालखीसाठी रॅम्पची रुंदी वाढणार:रेलींगची सुविधा, शिवभक्त, जिल्हाधिकारी, पाेलिस अधीक्षकांकडून संयुक्त पाहणी‎

यंदा होणाऱ्या कावड व पालखी उत्सवाच्या पृष्ठभूमीवर मंगळवारी सार्वजनिक कावड व पालखी उत्सव समिती, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, महसूल विभागाने गांधी ग्राम येथील पूर्णा नदीवरील सुविध . रस्ते, पायऱ्यांची रेलिंग, विद्युत पुरवठ्याची व्यवस्था करा {प्रत्यक्ष घाटात आणि नदीपात्रात उतरून पाहणी करण्यात आली. येणाऱ्या श्रावण मासात उद्भवणाऱ्या समस्येची चर्चा…

Read More

वादळाने केळीचे पीक उद्ध्वस्त; घरांवरील पत्रे गेली उडून:जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्याला बसला वादळी पावसाचा तडाखा

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दानापूर परिसरात सोमवारी सायंकाळी सात वाजेनंतर आलेल्या जोरदार वादळी पावसामुळे केळीच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा अक्षरश: झोपल्या आहेत. दानापूर परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांवरील टिनाचे पत्रे उडून गेले आहेत. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तेल्हारा तालुक्यातील दहीगाव येथे अल्पभूधारक शेतकरी प्रमोद गुणवंत अवताडे यांच्या घराला या वादळाचा…

Read More

अकोला पोलिस दलातील सेवानिवृत्त अधिकारी, अंमलदारांचा केला सत्कार

जिल्हा पोलीस दलातर्फे मे २०२६ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचा सत्कार सोहळा नुकताच अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. हा कार्यक्रम सोमवारी (दि. १) सकाळी ११ वाजता येथील पोलिस अधीक्षक कार्यालयातील विजय हॉलमध्ये घेण्यात आला. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात…

Read More

दिल्ली इमारत दुर्घटना- घरमालक दरमहा ₹10 लाख कमवत होता:आणखी 2 मजले बांधले जात होते, इमारत कोसळल्याने 6 लोकांचा जीव गेला

दिल्लीतील साकेत येथे 30 मे रोजी झालेल्या इमारत दुर्घटनेत नवीन खुलासा झाला आहे. अटक करण्यात आलेल्या इमारतीचा मालक करमवीरने पोलिसांना सांगितले की, तो इमारतीच्या चार मजल्यांमधून दरमहा सुमारे 10 लाख रुपये कमावत होता. प्रत्येक मजला सुमारे 2.5 लाख रुपये प्रति महिना भाड्याने दिला होता. तपासात असे समोर आले आहे की, इमारत कोसळली तेव्हा आणखी दोन…

Read More

श्रीकृष्ण- सुदामा भेटीने माहेश्वरी भवनाच्या भागवत कथेचे समापन:भागवताचे चिंतन हीच जीवनाची फलश्रुती: पू. राजेशकृष्ण

पुराणात भागवत हे श्रेष्ठ पुराण असून, यात सदा भगवान श्रीकृष्ण विराजमान असतात.अश्या भागवतचे सदा चिंतन करून भगवंताची प्राप्ती करावी असा हितोपदेश वृंदावन निवासी आंतरराष्ट्रीय भागवत कथाकार पू राजेशकृष्णजी महाराज यांनी केला. ते माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने पुरुषोत्तम मासानिमित्त माहेश्वरी भवन येथे आयोजित भागवत कथेत बोलत होते. भागवतकार पू. राजेशकृष्णजी महाराज यांच्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाची…

Read More

Ranveer Singh Faces Non-Cooperation; Sends Legal Notice to FWICE

9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक रणवीर सिंहने फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) ला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. एनडीटीव्हीच्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे. रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, रणवीरने ही कायदेशीर नोटीस 2 जून रोजी पाठवली होती. मात्र, नोटीसमध्ये अभिनेत्याने कोणत्या मागण्या केल्या आहेत, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. FWICE…

Read More

पुढील वर्षापर्यंत विद्यार्थी पाठशाळा सभागृहाचे बांधकाम पूर्णत्वास:आमदार प्रकाश भारसाकळे यांचे प्रतिपादन; विद्यार्थ्यांची ऊर्जा प्रेरणादायी

श्री संत वासुदेव महाराज सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकातून बघायला मिळालेली ज्ञान संपादणूक अतिशय आनंद देणारी व अभिनंदनीय आहे. हे विद्यार्थी म्हणजे देशाचे उज्वल भविष्य आहेत. या विद्यार्थ्यांच्या निवासासाठी गतवर्षी भूमिपूजन झालेल्या विद्यार्थी पाठशाळेच्या वास्तूची उभारणी पुढील वर्षापर्यंत निश्चित पूर्णत्वास जाईल, असा विश्वास आमदार प्रकाश भारसाकळे यांनी व्यक्त केला. शासकीय प्रक्रियेमुळे या कार्याला विलंब…

Read More

पाण्यासाठी पाणीपुरवठा विभागात ‘भीमशक्ती’ कार्यकर्त्यांचा ठिय्या:14 लाखांची योजनेची हाेणार चाैकशी, दहीहंडा परिसरात टंचाई‎

दहीहंडा येथील पाण्यासाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. योजनेतील कथित आर्थिक गैरव्यवहार, निकृष्ट विकासकामे, दलित वस्ती निधीचा दुरुपयोग आदींबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही कार्यकर्त्यांनी केली. अखेर कार्यकारी अभियंत्याने संबंधित प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. दहीहंडा गावाला ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेतून…

Read More