Headlines

कर्जमुक्ती योजनेत पोर्टलवरील रक्कम अंतिम राहणार:तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी पोर्टलवर नोंदवावी, सहकार आयुक्तांचे स्पष्टीकरण




राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत गावपातळीवर प्रसिद्ध झालेल्या याद्यांबाबत संभ्रम निर्माण झाल्यानंतर सहकार आयुक्त व निबंधक कार्यालयाने बुधवारी ता. २९ स्पष्टीकरण देत पोर्टलवरील रक्कम अंतिम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यात कर्जमुक्ती मध्ये बँकांनी योजनेच्या पोर्टलवर एकूण ३१.१७ लाख कर्जखात्यांची माहिती सादर केली होती. त्यापैकी महा-आयटी मार्फत संगणकीय संनियंत्रण करून २५ जुलै रोजी १६.९६ लाख कर्जखात्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ७.०३ लाख आणि व्यापारी बँकांचे ९.९३ लाख कर्जखाते आहेत. मात्र काही ठिकाणी गावपातळीवर प्रसिद्ध झालेल्या यादीतील व्यापारी बँकांमधील एनपीए खातेदार शेतकऱ्यांच्या नावासमोर दर्शविलेली थकबाकी आणि पोर्टलवरील रक्कम यात तफावत दिसून आल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, गावपातळीवर प्रसिद्ध केलेली यादी आणि पोर्टलवरील रक्कम यात फरक असल्यास योजनेच्या पोर्टलवरील थकबाकीची रक्कमच ग्राह्य धरण्यात येईल. पोर्टलवर दिसणारी थकबाकी ही ३१ मार्च २६ रोजीची असून १ एप्रिल २६ नंतरचे व्याज आकारले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना पोर्टलवरील रक्कम मान्य असल्यास त्यांनी तात्काळ आधार प्रमाणीकरण करावे. आधार प्रमाणीकरण यशस्वी झाल्यानंतर पावती मिळेल ज्यामध्ये कर्जमाफी होणाऱ्या रक्कमेची माहिती असेल. आधार प्रमाणीकरणानंतर ३१ मार्च २६ वरील कर्जबाकीच्या लाभाची रक्कम थेट डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा केली जाईल. कर्जमुक्तीनंतर शेतकऱ्यांना कर्ज बेबाकीचे प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच सर्व कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी संबंधित बँकेच्या शाखा आणि विविध कार्यकारी सेवा संस्थांमध्ये लावण्यात येईल. कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांना बँकेमार्फत खरीप पीक कर्जाची उपलब्धता देखील करून देण्यात येणार आहे. पोर्टलवरील रक्कम किंवा कर्जाबाबत इतर कोणतीही तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी पोर्टलवर नोंदवावी. त्या तक्रारीचे निराकरण जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीमार्फत करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. हे ही वाचा… 2 लाखांपर्यंतच्या थकबाकीदारांची पूर्ण कर्जमाफी:बँक खात्यांतील तफावतीबाबत काळजी करू नका, ते पैसे बँक भरणार- दत्तात्रय भरणे राज्यातील ज्या शेतकऱ्यांची थकबाकी 2 लाख रुपयांच्या आत आहे, त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले आहे. कर्जमाफीच्या यादीत रक्कम कमी दिसत असली तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याचे किंवा काळजी करण्याचे काहीही कारण नाही. ती उर्वरित रक्कम संबंधित राष्ट्रीयकृत बँकांकडूनच वर्ग केली जाणार आहे. कर्जमाफी प्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज वाटप करणे शक्य होणार असल्याचेही कृषीमंत्र्यांनी सांगितले. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *