Headlines

काव्यसंमेलन:भावस्पर्शी काव्यपंक्तींनी चांदवडला रसिक मंत्रमूग्ध, त्रिलोक गणेश मित्रमंडळाचा उपक्रम‎




वरचेगाव (चांदवड) येथील त्रिलोक गणेश मित्रमंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय काव्यसंमेलनात कवी केशव खटींग (परभणी) यांच्या भावस्पर्शी काव्यपंक्तींनी रसिक प्रेक्षकांना पूर्णपणे मंत्रमूग्ध केले. बाप-लेकीच्या नात्यावरील अत्यंत भावनिक कविता, ग्रामीण जीवन, कष्टकरी-शेतकऱ्यांचे वास्तव आणि ग्रामीण स्त्रीच्या कर्तृत्वाचा वेध घेणाऱ्या त्यांच्या ओघवत्या बोलीभाषेतील रचनांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली. यावेळी कधी हास्याचे निखळ फवारे उडाले, तर कधी काळजाला भिडणाऱ्या काव्यपंक्तींनी संपूर्ण संमेलन भारावून गेले होते. काव्यमैफलीत कवी नारायण पुरी (छत्रपती संभाजीनगर) यांनी आपल्या खास विनोदी शैलीत ‘प्रेमाचा जांगडगुत्ता’ सादर करून रसिकांना खळखळून हसवले. प्रियकर-प्रेयसीच्या नात्यातील खुमासदार प्रसंगांसोबतच त्यांनी सामाजिक विषमतेवर मार्मिक भाष्य केले. कवयित्री गुंजन पाटील (छत्रपती संभाजीनगर) यांनी स्त्रीमनातील सूक्ष्म भावना आणि माणसांमधील वाढता दुरावा मांडत ‘माणसातला दुरावा मिटावा’ असा माणुसकी व आपुलकीचा सुंदर संदेश दिला. कविता, साहित्य आणि सामाजिक जाणिवांचा हा सुरेख संगम अनुभवण्यासाठी परिसरातील साहित्यप्रेमी, काव्यरसिक, ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ग्रामीण भागात अशा दर्जेदार साहित्यिक मेजवानीचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष वरद घमंडी व सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. परिसरातील साहित्यप्रेमी, काव्यरसिक, ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *