Headlines

कचरेवाडीत तिसऱ्या दिवशी वृक्षारोपण‎:मराठा सेवा संघाच्या आचारसंहितेचे पालन करत शिंदे कुटुंबाने जपली परंपरा‎




मंगळवेढा कचरेवाडी येथील ज्येष्ठ शेतकरी दशरथ नामदेव शिंदे (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. पारंपरिक रूढी-परंपरा आणि अंधश्रद्धांना पूर्णपणे फाटा देत, मराठा सेवा संघाच्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करून शिंदे कुटुंबाने एक अत्यंत आदर्श आणि स्तुत्य उपक्रम राबवला आहे. या उपक्रमातून त्यांनी आज समाजात पर्यावरणाचा संदेश देत सामाजिक समतेचा वस्तुपाठ घालून दिला आहे. राख(आस्थी) नदीत न सोडता वृक्षारोपण करून जपल्या वडिलांच्या आठवणी जाग्या ठेवल्या. वडिलांच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी माती (राख व अस्थी गोळा करणे) चा कार्यक्रम केला जातो आणि राख व अस्थी नदीच्या पात्रात विसर्जित केली जाते. मात्र, शिंदे कुटुंबाने नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी ही राख व आस्था नदीत न विसर्जित करता एका खड्ड्यात टाकून कै.दशरथ शिंदे यांच्या तीन मुली व व दोन मुले तसेच सर्व नातेवाईक व पंचायत समिती सदस्य विनायक यादव यांचे हस्ते त्या खड्ड्यात झाडाचे रोप लावून वृक्षारोपण करण्यात केले. “निसर्गातून आलेल्या शरीराची राख पुन्हा निसर्गाच्याच कामी यावी आणि या झाडाच्या रूपाने वडिलांची स्मृती कायम जपता यावी, हा विचार यामागे होता. शिंदे समाजात देत दहावा आणि तेरावा यांसारख्या पारंपरिक विधींवर मोठ्या प्रमाणावर वेळ खर्च केला जातो आणि रूढी पाळल्या जातात. मात्र, शिंदे कुटुंबाने या सर्व जुन्या परंपरांना फाटा देत सामाजिक विधी पाचव्या दिवशी उरकण्याचा निर्णय घेतला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *