![]()
ननाशी ग्रामपंचायतीने १२ ऑगस्ट २०२२ रोजी वाईन शॉप सुरू करण्याबाबत संमत केलेल्या जुन्या ठरावावरून चार वर्षांनंतर गावात संताप उफाळून आला आहे. ग्रामस्थांना विश्वासात न घेता हा ठराव केल्याचा आरोप करत महिलांनी याविरोधात एल्गार पुकारला आहे. महिलांच्या या आक्रमकतेनंतर जि.प. प्रशासनानेही याप्रकरणी दखल घेतली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांनी दिंडोरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना २३ सप्टेंबर रोजी ननाशी येथे विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे निर्देश दिले. या ग्रामसभेला गटविकास अधिकाऱ्यांसह जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून ग्रामस्थांच्या हरकती नोंदवून घेतील. ग्रामसभेत होणाऱ्या निर्णयावर या ठरावाचे भवितव्य व पुढील प्रशासकीय कारवाई अवलंबून असणार आहे. या पार्श्वभूमीवर सुमित्रा धुळे, लीला वाघमारे, हेमलता वाघमारे, रंजना गायकवाड यांच्यासह परिसरातील महिलांनी प्रशासनाला निवेदन देऊन २०२२ मधील वाईन शॉपचा वादग्रस्त ठराव कायदेशीर प्रक्रिया मोडून केला असल्याने तो तत्काळ रद्द करावा, ठराव प्रक्रियेत नियमबाह्य बाबी आढळल्यास संबंधित ग्रामसेवकावर कडक कारवाई करावी, तसेच हा ठराव कोणी, कसा आणि कोणाच्या संमतीने केला याचा जाब २३ सप्टेंबरच्या ग्रामसभेत विचारला जाईल, अशा प्रमुख मागण्या लावून धरल्या आहेत.
Source link
ननाशीत वाईन शॉपच्या जुन्या ठरावावरून संताप:महिला आक्रमक; प्रशासनाकडून चौकशीचे आदेश