शासनाने पेट्रोल डिझेलवरील व्हॅटसह उपकर रद्द करावा:दर्यापुरात राष्ट्रवादी (श.प.) पक्षाने केली मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट, दर्यापूर तालुका शहर व ग्रामीणच्या वतीने डिझेल व पेट्रोलवरील व्हॅट व उपकर रद्द करण्याची मागणी तहसीलदार डॉ. रवींद्रकुमार कानडजे यांना मंगळवार २ रोजी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सद्यस्थितीत पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे महागाईने कंबरडे मोडले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू…