![]()
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट, दर्यापूर तालुका शहर व ग्रामीणच्या वतीने डिझेल व पेट्रोलवरील व्हॅट व उपकर रद्द करण्याची मागणी तहसीलदार डॉ. रवींद्रकुमार कानडजे यांना मंगळवार २ रोजी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सद्यस्थितीत पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे महागाईने कंबरडे मोडले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेमुळे सर्वसामान्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने केलेल्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीच्या मशागतीची वेळ जवळ आली आहे. पेरणीची वेळही जवळ आली आहे. त्यातच खते व बियाण्यांच्या किमती वाढल्या आहेत. आता पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे शेतकऱ्यांवर व्याजाने पैसे काढण्याची वेळ आली आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रात पेट्रोलवर २५ टक्के व्हॅट व दहा रुपये बारा पैसे उपकर आहे. तसेच डिझेलवर २४ टक्के व्हॅट व ३ रुपये उपकर आहे. संबंधित पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट व उपकर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कमी केल्यास याचा फायदा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. अभय गावंडे, गुड्डू पटेल, राजा तराळ, विजय हावरे, जयंत वाकोडे, अरविंद घाटे, नमित हुतके, सुशांत गावंडे, देवा गावंडे, राम धंदर, सौरभ जळमकर, अनिल इंगळे, शंतनू बोरेकर, अक्षय गावंडे, पप्पू गावंडे, महेंद्र कंकाळे, सचिन पवार, प्रशांत गावंडे, प्रकाश देशमुख, बुद्धभूषण डोंगरे, इमरान, गोपाल नांदुरकर, राजा तायडे, देवेश काळे, सागर काळे यांच्यासह शहर व ग्रामीण भागातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
Source link
शासनाने पेट्रोल डिझेलवरील व्हॅटसह उपकर रद्द करावा:दर्यापुरात राष्ट्रवादी (श.प.) पक्षाने केली मागणी