Headlines

Admin

कुमकुम मोहोडने जागतिक आर्चरी स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक:भारतीय महिला रिकर्व्ह संघाची शांघायमध्ये ऐतिहासिक कामगिरी

चीनमधील शांघाय येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत भारतीय महिला रिकर्व्ह संघाने सुवर्णपदक जिंकले. या सुवर्णविजेत्या संघात अमरावती येथील मणीबाई गुजराती हायस्कूलची विद्यार्थिनी कुमकुम अनिल मोहोडचा समावेश आहे. कुमकुमच्या या यशामुळे अमरावती शहरासह शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुमकुम मोहोड ही मणीबाई गुजराती हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील इयत्ता ११ वी…

Read More

अमरावतीत परिचारिकांचे कामबंद आंदोलन सुरू:'जीएमसी'मध्ये महिला परिचारिकेवर अत्याचार; पोलिसांच्या उदासीनतेविरोधात संतापाचा उद्रेक

अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) एका महिला परिचारिकेवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी स्थानिक पोलिस प्रशासनाने दखल न घेतल्याने महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या स्थानिक शाखेने आज, शनिवार, १६ मे पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे रुग्णालयातील रुग्णसेवा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे. संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ मे रोजी कर्तव्यावर असताना एका अज्ञात…

Read More

शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये:चांदूरबाजारमध्ये आमदार प्रवीण तायडे यांच्या बँक अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना

चांदूरबाजार प्रतिनिधी: तालुक्यातील कोणताही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व बँकांनी घ्यावी, अशा स्पष्ट सूचना आमदार प्रवीण तायडे यांनी दिल्या. येथील तहसील कार्यालयात आयोजित पीक कर्ज आढावा बैठकीत त्यांनी बँक अधिकाऱ्यांशी संवाद साधला. ब्लॉक लेव्हल बँकर्स कमिटीच्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार तायडे म्हणाले की, पीक कर्जासाठी बँकेत येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या अडचणी…

Read More

महिलांनी आत्मरक्षणासाठी दुर्गा बनावे:दर्यापूर येथील हिंदू जागरण सभेत काजल हिंदुस्थानी यांचे आवाहन

दर्यापूर येथे आयोजित हिंदू जागरण सभेत प्रखर हिंदुत्ववादी वक्त्या काजल हिंदुस्थानी यांनी महिलांना आत्मसंरक्षणासाठी ‘दुर्गा’ बनण्याचे आवाहन केले. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आणि स्वसंरक्षणासाठी हे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी पालकांना आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्यास सांगितले. तसेच, स्वतःला आणि मुलांना भ्रमणध्वनीच्या अतिवापरापासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला. अनोळखी व्यक्तींना सामाजिक माध्यमांवर मित्र बनवू नये, असे…

Read More

‘धमाल 4’ ची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलली:अक्षय कुमारच्या चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’ला क्लीन विंडो, अजय देवगणने मैत्री निभावली

अजय देवगण आणि अक्षय कुमारची मैत्री पुन्हा चर्चेत आहे. बातमी आहे की अजयने ‘धमाल 4’ ची रिलीज डेट पुढे ढकलली आहे, जेणेकरून ‘वेलकम टू द जंगल’ ला बॉक्स ऑफिसवर क्लीन विंडो मिळू शकेल. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्ट्सनुसार, आधी ‘धमाल 4’ 4 जुलै 2026 रोजी रिलीज होणार होती. आता हा चित्रपट 17 जुलै 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये येईल….

Read More

बकरी ईदपूर्वी गोवंशाचे टॅगिंग आवश्यक:जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे यंत्रणांना निर्देश, शहरात आठ ठिकाणी चेकपोस्ट

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंशाची कत्तल रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. पशूसंवर्धन विभागाने प्राण्यांचे टॅगिंग करावे आणि महापालिका स्तरावर याबाबत जनजागृती करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या प्राणीक्लेश समितीच्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक निकेतन कदम, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे आणि पशूसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय…

Read More

पुण्यात कारच्या काचा फोडून चोऱ्या करणारा गुन्हेगार जेरबंद:12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत; आरोपीवर 100 हून अधिक गुन्हे दाखल

पुण्यात कारच्या काचा फोडून चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अलंकार पोलिसांनी अटक केली आहे. राजू बाबूराव जवळकर (वय ५७, रा. डोणजे फाटा, ता. हवेली, जि. पुणे) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून १२ लाख १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तो रस्त्याच्या कडेला किंवा निर्जन ठिकाणी पार्क केलेल्या गाड्यांना लक्ष्य करत असे. अलंकार…

Read More

आंध्रमध्ये तिसऱ्या-चौथ्या मुलाच्या जन्मावर पैसे मिळतील:मुख्यमंत्री म्हणाले- जन्मदर वाढवण्याची गरज, कमी लोकसंख्येमुळे अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी शनिवारी घोषणा केली की, राज्यात तिसऱ्या मुलाच्या जन्मावर कुटुंबाला 30 हजार रुपये आणि चौथ्या मुलाच्या जन्मावर 40 हजार रुपये दिले जातील. नायडू श्रीकाकुलम जिल्ह्यात एका जनसभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, यापूर्वी ते लोकसंख्या नियंत्रणाच्या बाजूने होते, परंतु आता काळ बदलला आहे. आता जन्मदर वाढवण्याची गरज आहे….

Read More

Groups Warn of Self-Immolation Protest May 19 in Pune

देशभर गाजत असलेल्या नीट २०२६ परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून पुण्यातही संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित शिक्षण माफिया, एजंट आणि कोचिंग क्लासेसवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय छात्र संघटना आणि विविध सामाजिक संघटनां . निवेदनात म्हटले आहे की, देशभरात सातत्याने होत असलेल्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक…

Read More

कळमनुरीत दुचाकीवरील चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवले:बस स्थानकावरील पोलिस चौकी बंद असल्याने चोरट्यांचे फावले

कळमनुरी शहरातील बस स्थानकाजवळ गजबजलेल्या रस्त्यावरून दुचाकी वाहनावर भरदा वेगात आलेल्या चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविल्याची घटना शनिवारी तारीख 16 सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे कळमनुरी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील कडपदेव येथील सुरेखा चव्हाण या त्यांचे वडील सुभाष राठोड दोघेजण कामानिमित्त कळमनुरी येथे आले होते. सायंकाळीच्या…

Read More