![]()
देशभर गाजत असलेल्या नीट २०२६ परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून पुण्यातही संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित शिक्षण माफिया, एजंट आणि कोचिंग क्लासेसवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय छात्र संघटना आणि विविध सामाजिक संघटनां
.
निवेदनात म्हटले आहे की, देशभरात सातत्याने होत असलेल्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत आहे. लाखो विद्यार्थी दिवस-रात्र मेहनत घेऊन परीक्षा देतात; मात्र काही शिक्षण माफिया आणि भ्रष्ट प्रवृत्तीमुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जात आहे. लातूर येथे या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली असली तरी, या रॅकेटमागील सर्व संबंधितांची चौकशी होणे गरजेचे असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
पुण्यातही अनेक कोचिंग क्लासेस नियमबाह्य प्रवेश प्रक्रिया राबवत असून, मोठमोठ्या जाहिराती आणि खोट्या यशकथा दाखवून विद्यार्थ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही क्लासेस विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये शुल्क घेत असून, गुणवत्तेपेक्षा केवळ व्यावसायिक फायद्यासाठी शिक्षण व्यवस्था चालवली जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अशा संस्थांची आर्थिक चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, पेपरफुटीच्या तणावातून आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत द्यावी आणि परीक्षा दिलेल्या सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.
दरम्यान, येत्या १९ मे २०२६ रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आत्मदहन आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा अखिल भारतीय छात्र संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. या आंदोलनात पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. मच्छिंद्र चिंचोळे, पुणे जिल्हाध्यक्ष अक्षय बोडके, पुणे जिल्हा अल्पसंख्याक उपाध्यक्ष सय्यद समीर टीपु यांच्यासह विविध सामाजिक आणि शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.
हे ही वाचा…
NEET पेपरफुटी प्रकरण- 9वी अटक, पुण्यातील शिक्षिकेला अटक:NTA ने तज्ज्ञ म्हणून तैनात केले होते, विद्यार्थ्यांना बॉटनी-झूलॉजीचे अनेक प्रश्न सांगितले
CBI ने NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील आणखी एका शिक्षिकेला दिल्लीतून अटक केली आहे. आरोपीची ओळख वरिष्ठ बॉटनी शिक्षिका मनीषा गुरुनाथ मांढरे अशी झाली आहे. तिच्यावर आरोप आहे की तिने परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना बॉटनी आणि झूलॉजीचे अनेक प्रश्न सांगितले होते. सविस्तर वाचा…