Headlines

Bank of India 121st Foundation Day; New Corporate Identity Launch


मुंबई11 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘बँक ऑफ INDIA’ने आपला 121 वा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. ग्राहक-केंद्रित बँकिंग, तंत्रज्ञानाधारित नवोन्मेष, आर्थिक समावेश आणि विकसित भारताच्या ध्येयाप्रती आपली बांधिलकी बँकेने पुन्हा अधोरेखित केली आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून बँकेच्या 121 व्या स्थापना दिनाच्या विशेष लोगोचे अनावरण, नव्या कॉर्पोरेट ऑडिओ-व्हिज्युअल फिल्मचे लोकार्पण आणि व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (MD & CEO) यांचा संदेश प्रसिद्ध करण्यात आला.

एका शाखेपासून जागतिक ओळखीपर्यंतचा प्रवास

7 सप्टेंबर 1906 रोजी एका शाखेपासून आणि मोजक्या कर्मचाऱ्यांसह सुरू झालेला बँक ऑफ INDIA चा प्रवास आज 121 वर्षांनंतर अत्यंत भक्कम स्थितीत पोहोचला आहे. भारताच्या आर्थिक प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देणारी ही बँक देशातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असून तिने जागतिक स्तरावरही आपली भक्कम उपस्थिती नोंदवली आहे.

बँकेच्या या प्रवासातील मुख्य टप्पे आणि यश असे…

  • विस्तारित नेटवर्क: सध्या बँकेकडे सुमारे 37,000 ग्राहक संपर्क केंद्रे आणि 52,000 हून अधिक कर्मचाऱ्यांचे मजबूत जाळे आहे, ज्याद्वारे दुर्गम ग्रामीण भागांपर्यंत सेवा दिली जात आहे.
  • आर्थिक भरारी: Q1 FY27 मध्ये बँकेचा एकूण जागतिक व्यवसाय ₹17.50 लाख कोटींच्या पुढे गेला आहे. तसेच, FY26 मध्ये बँकेने वार्षिक निव्वळ नफ्यात ₹10,000 कोटींचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे.

एमडी आणि सीईओ राजनेश कर्नाटक यांचे प्रतिपादन

बँक ऑफ INDIA चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजनेश कर्नाटक म्हणाले, “आमच्या 121 व्या स्थापना दिनानिमित्त आम्ही एका गौरवशाली वारशाचा उत्सव साजरा करत आहोत. विश्वासाच्या पायावर उभारलेला, तंत्रज्ञानाने सक्षम आणि विकसित भारताच्या आकांक्षांशी सुसंगत असा बँक ऑफ INDIA चा नवा अध्याय आम्ही लिहीत आहोत.” त्यांनी ग्राहकांचे आभार मानत ‘Relationship Beyond Banking’—‘रिश्तों की जमापूंजी’ हे ब्रीदवाक्य अधिक सार्थ करण्याचे आश्वासन दिले.

देशभर विविध सामाजिक उपक्रम

स्थापना दिनानिमित्त बँकेच्या मुख्यालयीन गणेश पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यासोबतच देशभरातील विविध शाखांमध्ये खालील उपक्रम राबवण्यात आले. ते असे…

  • वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे आणि आरोग्य तपासणी उपक्रम.
  • ग्राहक संवाद कार्यक्रम तसेच निवृत्त कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सत्कार.
  • सर्व शाखा व कार्यालयांची आकर्षक रोषणाई आणि ग्राहक-कर्मचाऱ्यांमध्ये मिठाईचे वाटप.
  • बँक ऑफ INDIA ने या सोहळ्याच्या माध्यमातून ग्राहकांशी असलेले नाते अधिक दृढ करत आणि तंत्रज्ञानाचा अंगीकार करत भारताच्या विकासात मोलाचे योगदान देण्याचा संकल्प पुन्हा एकदा व्यक्त केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *