Headlines

चितळे बंधूंच्या अत्याधुनिक प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री करणार:भोरमध्ये 250 कोटींच्या 'रांजे व्हिजन पार्क'चे 16 एप्रिलला उद्घाटन

चितळे बंधू मिठाईवाले यांच्या भोर तालुक्यातील रांजे येथील अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन १६ एप्रिल रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. ‘रांजे व्हिजन पार्क’ असे नाव असलेल्या या प्रकल्पासाठी सुमारे २५ एकर जागेवर तब्बल २५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. चितळे कुटुंबातील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी इंद्रनील व केदार चितळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान:भांडेगाव येथे लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप, महसूल अधिकाऱ्यांची उपस्थिती

हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सोमवारी ता. १३ गावकऱ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप करून इतर प्रश्‍नांची सोडवणूक करण्यात आली आहे. भांडेगाव येथे आयोजित कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, नायब तहसीलदार अनिता वडवळकर, नरेंद्र इंगळे, मंडळ अधिकारी शिल्पा चाटसे, पोलिस पाटील ज्ञानेश्‍वर जाधव, खांबाळा पोलिस पाटील सुरेश…

Read More

हिंगोली पोलिसांची अभिमानास्पद कामगिरी:सीसीटीएनएस कामगिरीत राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, २०१ पैकी मिळाले २०० गुण

पोलिस दलाच्या सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये हिंगोली जिल्हा पोलिस दलाने २०१ पैकी २०० गुण मिळवत राज्यातील ५३ पोलिस घटकामधून दुसरा क्रमांक मिळविला आहे. तर नांदेड परिक्षेत्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे. राज्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी हिंगोली जिल्हा पोलिस दलाच्या कामगिरीचे कौतgक केले आहे. राज्यात पोलिस दलाने सीसीटीएनएस प्रणाली सुरु केली आहे. यामध्ये गुन्हयांची ऑनलाईन नोंद करणे, गुन्ह्याचा तपास…

Read More

बार्टीच्या महासंचालकांना दणका:फेलोशिप जाहिरात प्रसिद्ध न केल्याने राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने बजावली नोटीस

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांनी २०२३ च्या पीएचडी संशोधकांसाठीची फेलोशिप जाहिरात अद्याप प्रसिद्ध न केल्यामुळे, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने (NCSC) या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३३८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करत बार्टीच्या महासंचालकांना नोटीस बजावली असून ३० दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश…

Read More

Maharashtra Pig Farming Subsidy Up to 75%; CM Fadnavis Govt Decision

राज्यातील पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत’ आता वराह पालनाचा . शासनाने जारी केलेल्या निर्णयानुसार, वराह पालनासाठी आता कुक्कुटपालन आणि मेंढी पालनाप्रमाणेच सवलती मिळणार आहेत. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ५० टक्के, तर अनुसूचित जाती…

Read More

'जीवलगा' गाताना नेसली होती फाटकी साडी:शांता शेळके यांनी उलगडले आशाताईंच्या स्वभावाचे अनोखे पैलू, पुस्तकातून सांगितलेले अनेक किस्से

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संगीत विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी आशाताईंच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आशाताईंच्या निधनानंतर अनेकांनी त्यांच्याविषयीचे किस्से तसेच आठवणींना उजाळा दिला आहे. ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांनी ‘स्वरस्वामिनी आशा’ या पुस्तकातून आशाताईंच्या स्वभावावर भाष्य करत त्यांचे अनेक किस्सेही सांगितले आहेत….

Read More

बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकालाच विलंब का?:युद्धाचे कारण पुढे करून इंदू मिलमधील स्मारकाच्या कामाला मुदतवाढ -विजय वडेट्टीवार

आखातातील युद्धामुळे मुंबईतील इंदू मिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम आणखी वर्षभर लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी सरकारवर निशाणा साधत सरकार महामानवांच्या विचारांप्रती अनास्था का बाळगत आहे? असा सवाल केला आहे. आखात इराण विरुद्ध अमेरिका – इस्त्रायल युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे तांबे व स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला…

Read More

भोंदू अशोक खरातसोबत राजकीय नेत्यांचेही व्हिडिओ:हे सर्व उघडपणे समोर यायला हवे, आमदार रोहित पवारांची मागणी

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक महिलांवर केलेले लैंगिक अत्याचार आणि त्याचे समाजमाध्यमांवर व्हायरल झालेले संतापजनक व्हिडिओ यामुळे संपूर्ण राज्यात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, या गंभीर प्रकरणाची आता एसआयटी मार्फत सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळातही मोठ्या प्रमाणावर उमटत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी यासंदर्भात…

Read More

'माझा भाऊ इथं आयजी, त्याला धर्मसंकटात नाही टाकायचं':विश्वास नांगरे पाटलांनी दिला आशाताईंच्या आठवणींना उजाळा

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे मुंबईतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले असून, त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रासह संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी आशाताईंच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. भारतरत्न सचिन तेंडुलकरने अंत्यदर्शनावेळी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली, तर आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनीही गेल्याच आठवड्यात…

Read More

अशोक खरातने गरोदर महिलेलाही नाही सोडलं; हिरव्या द्रव्याने वाढलं रहस्य:आज न्यायालयासमोर हजर केले जाणार

नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. दैवी शक्ती आणि तंत्र-मंत्राच्या आड महिलांचे शोषण करणाऱ्या या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली आहे. आता या प्रकरणात आणखी एक गंभीर बाब उघड झाली असून, सात महिन्यांच्या गरोदर महिलेलाही खरातने लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे समाजात संतापाची लाट उसळली…

Read More