बिहू नृत्यातून पुणेकरांनी अनुभवली आसामच्या संस्कृतीची झलक:होजगिरी नृत्य, संगीताची मंत्रमुग्ध करणारी मेजवानी सादर
पुण्यात ‘रोंगाली बिहू’ कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आसामच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडले. बिहू नृत्याच्या वेगवान लय, तालबद्ध हालचाली आणि पारंपरिक वेशभूषेने पुणेकरांना आसामच्या सांस्कृतिक वैभवाची झलक अनुभवता आली. हा कार्यक्रम भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि ‘असोमी’ यांच्या संयुक्त विद्यमाने एरंडवण्यातील भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलात आयोजित करण्यात आला होता. भारती…