Headlines

देशाच्या संविधानाचे सिंधी भाषेत प्रकाशन:अकोलेकर ठरले सोहळ्याचे साक्षीदार; उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांची उपस्थिती‎

भारतीय संविधानाचे आता सिंधी भाषेतही अधिकृत विमोचन झाले आहे. या क्षणाचे साक्षीदार होण्याचा बहुमान अकोल्यातील सिंधी समाजाला मिळाला आहे. सिंधी भाषा दिनानिमित्त उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उपराष्ट्रपती भवनात हा सोहळा पार पडला. माजी नगराध्यक्ष हरिशभाई अलिमचंदानी यांच्या मार्गदर्शनात अकोल्याच्या शिष्टमंडळाने या सोहळ्यात उपस्थिती लावली. खासदार अनुप धोत्रे यांची या सोहळ्याला उपस्थिती होती. सिंधी…

Read More

‘आरटीई’मधून 2673 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची मिळणार संधी:गटशिक्षणाधिकारी करणार प्रवेशाच्या कागदपत्रांची खातरजमा‎

जिल्ह्यात आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेला वेग आला असून शुक्रवारी पहिली यादी जाहीर झाली आहे. यंदा पहिलीच्या वर्गासाठी २६७३ विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची संधी मिळणार असून २८७२ जागांसाठी सोडत काढण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना संदेश पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. पालकांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून पाल्यांच्या प्रवेशाच्या कागदपत्रांची खातरजमा करुन प्रवेश पत्र शाळेत दाखवल्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश दिला जाणार आहे….

Read More

दीड किलोमीटर अंतराचा रस्ता जर्जर:धामोडीच्या पारधी बेड्यावरील नागरिकांचा रस्ते दुरुस्तीसाठी आर्त स्वर‎

आदर्श गाव, स्मार्ट सिटी अशा कितीतरी महत्वाकांक्षी योजना शासनाच्यावतीने सुरू करण्यात आल्या असल्या तरी वास्तव काहीतरी वेगळेच आहे. दर्यापूर तालुक्यातील धामणा हे गाव याची साक्ष देते. शंभर टक्के पारधी वस्ती असलेल्या या गावाला स्वतंत्र रस्ता नाहीच, एका गावांतून नागरिकांनी कसातरी मार्ग काढला. मात्र हा दीड किलोमीटरचा रस्ता म्हणजे मरणयातना भोगण्याशिवाय दुसरं काहीही नाही. त्यामुळे आम्हीही…

Read More

अकोला जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांत घबराट‎:यापूर्वी 2021,2020, मार्च 2024 मध्ये जाणवला हाेता धक्का; सुदैवाने जिवित हानी टळ

. मराठवाड्यात शनिवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवल्याने अकोल्यातही ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८.५० च्या सुमारास काही भागात अतिसौम्य धक्के काहींना जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर तपासले असता भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली आहे. या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.७ एवढी नोंदवण्यात आली आहे. याचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील उत्तरेला होता ,असे जिल्हा प्रशासाकडून…

Read More

बार्शीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यास मंजुरी:विरोधकांचे पक्षपातीपणाचे आरोप, सत्ताधाऱ्यांकडून कामांचे समर्थन‎

येथील पुतळा पार्क परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या जागी आता भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. बार्शी नगर परिषदेच्या शुक्रवारी (दि. १०) झालेल्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. नगराध्यक्षा तेजस्विनी कथले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. यावेळी मुख्याधिकारी तैमुर मुलाणी यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. दिवाणी न्यायालयासमोर…

Read More

जिल्हा रुग्णालयात मोफत फिजिओथेरपी:दरमहा होणारा 15 हजारांचा खर्च वाचेल, ऑगस्टपासून कॅन्सरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी 10 बेडचा स्वतंत्र कक्ष‎

. जिल्हा शासकीय रुग्णालयात आता कॅन्सर रुग्णांसाठी मोफत फिजिओथेरपी उपचार सुरू करण्यात येणार आहेत. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हे उपचार प्रत्यक्षात सुरू होणार असून, यासाठी १० बेडचा स्वतंत्र कक्ष उभारण्यात येत आहे. यामुळे खासगी रुग्णालयांत उपचारांसाठी होणारा १० ते १५ हजार रुपयांचा मासिक खर्च वाचणार आहे. सध्या जिल्ह्यात कॅन्सरचे प्रमाण वेगाने वाढत आहे. जिल्ह्यात दरवर्षी…

Read More

दूधपंढरीत चारा टंचाईची झळ; मुरघासाचा खर्च आवाक्याबाहेर!:जिल्ह्यात 16 लाख पशुधन, 58 हजार हेक्टरवर मका‎

उन्हाची तीव्रता वाढत असतानाच, जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. उपलब्ध चाऱ्याचे भाव कमालीचे वाढले आहेत. यापार्श्वभूमीवर सुमारे १६ लाखांवर पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पशुपालकांनी मुरघासाच्या बॅगा भरण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू, वाढत्या दरामुळे एका हजार ते अकराशे किलोच्या बॅगेचा खर्च चार ते पाच हजारांवर पोहोचला आहे. राज्यात दूधउत्पादनात अहिल्यानगर जिल्हा अग्रेसर…

Read More

दुगावला उलगडले मीराबाईंच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग:संत मीराबाई संगीतमय कथेच्या पाचव्या दिवशी राधा महाराजांचे निरुपण‎

दुगाव येथील दुग्धेश्वर मैदान येथे सुरू असलेल्या संत मीराबाई संगीतमय चरित्रकथेचा पाचवा दिवस अत्यंत भावपूर्ण आणि ज्ञानवर्धक ठरला. कथाकार वैष्णवभूषण श्री राधा महाराज (देवरगावकर) यांनी शुक्रवारी (दि. १०) संत मीराबाईंच्या जीवनातील अत्यंत कठीण मात्र तितक्याच प्रेरणादायी प्रसंगांचे वर्णन केले. कथेच्या पाचव्या दिवशी मीराबाईंचा चित्तोडगडचे राजकुमार कुंवर भोजराज यांच्याशी झालेला विवाह सोहळा सादर करण्यात आला. श्री…

Read More

इंदूर – पुणे मार्गावरील वाहतूक मंगळवारी 13 तास राहणार बंद:मनमाडमध्ये जयंती मिरवणुकांमुळे पाेलिसांचा निर्णय‎

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी (दि. १४) सकाळी ११ ते रात्री १२ या कालावधीत मालेगाव- मनमाड- अहिल्यानगर (इंदूर- पुणे) राष्ट्रीय महामार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णतः बंद राहणार आहे. मनमाड शहरात निघणाऱ्या भव्य मिरवणुका व शोभायात्रांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी याबाबत वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली…

Read More

शेती फायद्याची असेल तरच देशाचा विकास:येवला येथे महात्मा फुले जयंती कार्यक्रमात जाधव यांचे प्रतिपादन‎

खासगीकरण आणि मक्तेदारीमुळे सामान्य माणसाच्या उपजीविकेची साधने हिसकावून घेतली जात आहेत. भांडवलीकरणामुळे रोजगार आणि शेतीचे प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असला तरी त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. जोपर्यंत सामान्य शेतकऱ्याचा शेती व्यवसाय फायद्याचा होऊन त्याचा विकास होत नाही, तोपर्यंत देशाचा सर्वांगीण विकास होणे अशक्य आहे, असे प्रतिपादन कॉम्रेड किशोर…

Read More