Headlines

दूधपंढरीत चारा टंचाईची झळ; मुरघासाचा खर्च आवाक्याबाहेर!:जिल्ह्यात 16 लाख पशुधन, 58 हजार हेक्टरवर मका‎




उन्हाची तीव्रता वाढत असतानाच, जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. उपलब्ध चाऱ्याचे भाव कमालीचे वाढले आहेत. यापार्श्वभूमीवर सुमारे १६ लाखांवर पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पशुपालकांनी मुरघासाच्या बॅगा भरण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू, वाढत्या दरामुळे एका हजार ते अकराशे किलोच्या बॅगेचा खर्च चार ते पाच हजारांवर पोहोचला आहे. राज्यात दूधउत्पादनात अहिल्यानगर जिल्हा अग्रेसर आहे, दैनंदिन दूध उत्पादन सुमारे ४२ लाख लिटर आहे. पुणे, मुंबईसह राज्यभरात जिल्ह्यातून दुधाचा पुरवठा होता. उन्हाचा पारा वाढत असून रब्बी हंगामातील चारा पिकांची कापणी झाली आहे. परंतू, विहिर बागायत व धरणांच्या लाभ क्षेत्रातील पट्ट्यात चारा लागवड करण्यात आली होती. परंतू, तापमानाचा पारा ३८ अंशावर पोहोचला असल्याने, घासाची वाढ कमी होत आहे. त्यामुळे चारा उत्पादनात घट झाली आहे. दुसरीकडे मूरघासाकडे पशुपालकांसह शेतकऱ्यांचा कल आहे. रब्बी हंगामात कृषी विभागाच्या माहितीनुसार सुमारे ५८ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. उंच वाढलेली कणसाची मका प्रतिगुंठा दीड दोन हजार रुपये दराने विक्री होत आहे. याव्यतिरिक्त कुट्टी करण्याचा खर्चही वेगळा येत आहे. याव्यतिरिक्त दुभत्या जनावरांच्या खुराकाचेही भाव वाढल्यामुळे दूध उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. असे आहे मुरघास बॅगचे गणित एका बॅगसाठी सुमारे एक ते दीड गुंठा मका खरेदी (२ हजार) करावी लागते, याव्यतिरिक्त कापणी व कुट्टी करून प्रतिबॅग १२०० रुपये, मूरघास बॅग ५०० रुपये असा एकूण प्रतिबॅग खर्च वाहतुकीसह सुमारे चार ते पाच हजारांवर जातो आहे. मक्याचे दर काही भागात भागात अधिक असल्याने या खर्चात वाढ होत आहे. पुढील दोन महिने चाऱ्याची टंचाई असल्याने, मूरघास बॅगा भरण्याकडे कल वाढला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *