![]()
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी (दि. १४) सकाळी ११ ते रात्री १२ या कालावधीत मालेगाव- मनमाड- अहिल्यानगर (इंदूर- पुणे) राष्ट्रीय महामार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णतः बंद राहणार आहे. मनमाड शहरात निघणाऱ्या भव्य मिरवणुका व शोभायात्रांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी याबाबत वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे. संभाव्य गर्दी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मनमाड शहरात आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात होत आहे. शहरातील विविध भागांतून मिरवणुका सायंकाळी मार्गक्रमण करणार आहेत. या मिरवणुका इंदूर-पुणे महामार्गावरील नगीना मशीद, तुफान चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे जाऊन समाप्त होतील. मिरवणुकांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असून, बाहेरगावाहूनही उपस्थिती अपेक्षित आहे.
Source link
इंदूर – पुणे मार्गावरील वाहतूक मंगळवारी 13 तास राहणार बंद:मनमाडमध्ये जयंती मिरवणुकांमुळे पाेलिसांचा निर्णय