Headlines

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का!:विधानपरिषदेच्या तोंडावर 3 आमदार महायुतीच्या गळाला? बैठकीला उपस्थित!

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, मतदानाची तारीख जशी जवळ येत आहे, तसा महायुतीला मिळणारा पाठिंबा वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याच निवडणुकीच्या अनुषंगाने आज सोलापुरात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या स्थानिक नेत्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मात्र, विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे…

Read More

एसटी महामंडळाच्या बैठकीत हाय-व्होल्टेज ड्रामा!:एमडींच्या अंगावर धावून गेले खोत-पडळकर; मंत्री प्रताप सरनाईकांसमोरच मोठा राडा

एसटी महामंडळाच्या बैठकीत आज अभूतपूर्व गदारोळ आणि हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा सुरू असतानाच आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर प्रचंड आक्रमक झाले. त्यांनी एसटीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने मध्यस्थी केल्यामुळे बैठकीतील…

Read More

उन्हाळ्यात महिलांमध्ये 'यूटीआय'चा धोका वाढला:ओले कपडे, लघवी रोखणे ठरू शकते घातक; स्त्रीरोग तज्ज्ञांचा इशारा

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवास आणि जलक्रीडांमुळे महिलांमध्ये युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (यूटीआय) चा धोका वाढला आहे. प्रवासात लघवी रोखून धरणे, ओल्या कपड्यांमध्ये जास्त वेळ राहणे आणि कमी पाणी पिणे ही या संसर्गाची प्रमुख कारणे आहेत. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कैशरीन खान यांनी महिलांना या काळात विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. डॉ. खान यांच्या मते, महिलांचा मूत्रमार्ग लहान…

Read More

अमरावतीत हायव्होल्टेज ड्रामा!:किरीट सोमय्यांच्या गाडीसमोर MIM नगरसेवकांचे 'रास्ता रोको' आंदोलन; पोलिसांशी बाचाबाची

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आज अमरावती दौऱ्यावर असताना महापालिका परिसरात प्रचंड गोंधळ आणि राजकीय थरार पाहायला मिळाला. सोमय्या अमरावती महानगरपालिकेत एका बैठकीसाठी आले असता, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लीमीन (MIM) पक्षाच्या नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या दौऱ्याला तीव्र विरोध दर्शवला. आंदोलनकर्त्यांनी थेट किरीट सोमय्या यांच्या गाडीसमोर धाव घेत रस्त्यावर झोपून ‘रास्ता रोको’ सुरू…

Read More

भाजपला रोखण्यासाठी महिला पंतप्रधानांचा चेहरा द्या!:भास्कर जाधवांचे मोठे वक्तव्य, एक चेहरा दिसतोय, पण नाव सांगणार नाही!

देशातील राजकारणात भाजपला प्रभावी आव्हान द्यायचे असेल, तर विरोधी पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महिला पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करावा, असे वक्तव्य शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे. “महिला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर झाला, तर देशाच्या राजकारणात मोठा चमत्कार घडू शकतो,” असे सांगत त्यांनी नव्या राजकीय चर्चेला तोंड फोडले. चिपळूण येथे…

Read More

नाशिक विधान परिषदेत महायुतीतील बंड शमले:अखेर गोकुळ गीते यांची माघार; कुणाल दरडेंचा मार्ग सुकर; महायुतीच्या नेत्यांची शिष्टाई फळाला

नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील अंतर्गत बंडखोरी शमवण्यात नेत्यांना मोठे यश आले आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी अखेर आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची नाराजी दूर करण्यासाठी महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून सुरू असलेले मनधरणीचे प्रयत्न अखेर फळाला आले आहेत. गोकुळ गीते यांनी केवळ माघारच घेतली नाही, तर…

Read More

राष्ट्रवादीच्या 27व्या वर्धापन दिनाला वादाची किनार:बॅनरवर महापुरुषांचे फोटो गायब असल्याचा रोहित पवारांचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापन दिन आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात उत्साहात साजरा होत आहे. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरातून कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र या सोहळ्याला सुरुवात होण्यापूर्वीच सभागृहाबाहेर लावण्यात आलेल्या बॅनर्सवरून नवा वाद निर्माण झाला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बॅनर्सवर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,…

Read More

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. बलवंत जेऊरकर यांचे निधन:ज्येष्ठ साहित्यिक प्रा. बलवंत जेऊरकर यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक आणि सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राध्यापक बलवंत जेऊरकर यांचे गुरुवार, 11 जून रोजी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. ज्येष्ठ अनुवादक, लेखक आणि हिंदी भाषा साहित्याचे ते व्यासंगी होते. अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. हिंदीतील अमृत राय लिखित प्रेमचंद- लेखणीचा शिलेदार या चरित्र ग्रंथाचा त्यांनी मराठीत अनुवाद केला होता. Source link

Read More

सरसगट कर्जमाफी अन् खतांच्या तुटवड्यावरून क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक:जिंतूर-कनेरगाव नाका मार्गावर तब्बल दोन तास 'रस्ता रोको'!

राज्यातील शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी द्यावी, बियाणे, खतांचा तातडीने मुबलक पुरवठा करावा यासह इतर मागण्यांसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी ता. 11 सकाळी आकरा वाजता जिंतूर ते कनेरगावनाका मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे गोरेगाव मार्गे विदर्भात जाणारी वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. राज्यात शेतकऱ्यांसाठी शासनाने कर्जमुक्तीची घोषणा केली, मात्र सदर योजना…

Read More

अनोखी मागणी:माझ्या जमिनीचे पैसे परत घ्या, पण शक्तीपीठ महामार्गावर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारा!, धाराशिवच्या शेतकऱ्याचा सरकारला थेट प्रस्ताव

महाराष्ट्र शासनाच्या ‘शक्तीपीठ महामार्गा’ला सध्या राज्यभरातील शेतकरी आणि विविध संघटनांकडून जमीन संपादनावरून तीव्र विरोध होत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये या प्रकल्पाविरोधात आंदोलने तीव्र झाली असतानाच, धाराशिव जिल्ह्यातून मात्र एक अत्यंत वेगळी आणि भावनिक भूमिका समोर आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील चिखली गावचे तरुण शेतकरी धनंजय तांबे यांनी या महामार्गासाठी स्वतःची हक्काची एक एकर जमीन सरकारला चक्क ‘मोफत’…

Read More