Headlines

उद्धव ठाकरेंना अमरावतीत मोठा धक्का, जिल्हाप्रमुखांचा राजीनामा, शिंदे सेनेत जाणार?:बच्चू कडूंच्या संपर्कानंतर मोठी घडामोड

राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच अमरावतीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे अमरावती जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी ही घडामोड घडल्याने त्याकडे विशेष लक्ष वेधले गेले. पडोळे हे लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश…

Read More

महाराष्ट्रात वाढणार उष्णतेची तीव्रता आणि अतिवृष्टी:30 वर्षांत 2 अंशांपर्यंत तापमान वाढीचा ‘सीएसटीइपी’चा इशारा

‘सेंटर फॉर सायन्स, टेक्नोलॉजी अँड पॉलिसी’ (सीएसटीइपी) या संशोधन संस्थेने भारतीय हवामान विभाग आणि आयपीसीसीच्या आकडेवारीचा अभ्यास करून एक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, 2021 ते 2050 या काळात महाराष्ट्रातील उन्हाळा आणि हिवाळ्यातील सरासरी तापमान 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढणार आहे. तसेच, पावसाचे दिवस आणि अतिवृष्टीच्या घटनांमध्येही मोठी वाढ अपेक्षित आहे. वाढत्या वायू…

Read More

केंद्राची उद्योगांना 16 लाख कोटी, तर शेतकऱ्यांना 1.88लाख कोटींचीच कर्जमाफी:देशातील शेतकऱ्यांच्या तुलनेत उद्योगपतींची कर्जमाफी आठ पट

केंद्र सरकारने उद्योगपतींना ११ वर्षांत १६.३५ लाख कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. या तुलनेत बळीराजाला १,८८,२५४ कोटींचीच कर्जमाफी दिली आहे. शेतकऱ्यांच्या तुलनेत उद्योगपतींची कर्जमाफी साडेआठ पट आहे. २०१८-१९ या एकाच वर्षात केंद्राने कंपन्यांचे सर्वाधिक १,२५,३२० कोटींचे ‘लोन राइट ऑफ’ केले. त्याच वर्षी शेतकऱ्यांना १२,७२८ कोटींची कर्जमाफी दिली आहे. उद्योगपतींची वर्ष-२०१८-१९ ची कर्जमाफी दहा पट आहे. महाराष्ट्राच्या…

Read More

भंडाऱ्यात एफडीएची मोठी कारवाई:मधुमेह, हृदयरोग त्वरित बरे करण्याचा दावा अंगलट, दोन दुकानातून 30 हजारांचा माल जप्त

भंडारा शहरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. गंभीर आजार बरे करण्याचे खोटे दावे आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन औषध प्रतिष्ठानांवर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत 29 हजार 792 रुपये किमतीचा आक्षेपार्ह औषध साठा जप्त करण्यात आला. ‘औषधे व जादूटोणादी उपाय (आक्षेपार्ह जाहिरात) कायदा, 1954’ चे…

Read More

जय पवारांना 10 कोटींचे 'कर्ज' नाही तर 'ॲडव्हान्स' दिला:बंगला खरेदीसाठी मागील वर्षी केलेला व्यवहार, विक्रम काकडेंचा खुलासा

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी महायुतीची उमेदवारी मिळाल्यापासून चर्चेत असलेले विक्रम काकडे आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. काकडे यांनी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांना १० कोटी रुपयांचे कर्ज दिल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. मात्र, “ते कर्ज नसून बंगला खरेदी करण्यासाठी दिलेली आगाऊ रक्कम आहे,” असा महत्त्वपूर्ण खुलासा खुद्द…

Read More

उबाठाने राज्यसभेवर फक्त मोठ्या लोकांना संधी दिली:सामान्य कार्यकर्त्याला काय मिळाले?, पराभव होणार म्हणून वायफळ बडबड सुरू- गिरीश महाजन

उबाठाची अवस्था किती वाईट झाली आहे हे आपण सर्व जण पाहत आहोत, त्यांचा एकसुद्धा उमेदवार निवडून येणार नाही. त्यांना असे वाटते की विधानसभा आणि विधान परिषद काही कामाची नाही, मनपात जिंकता आले नाही तर तिथेही ते तसेच म्हणत आहेत, त्यांचा पराभव झाला की त्यांना वाटते की हे काही कामाचेच नाही, असे भाजपचे मंत्री गिरीश महाजन…

Read More

पिग्मी एजंटांच्या कमिशनमध्ये कपात:शासनाच्या जाचक निर्णयाविरोधात लाखांदूर येथे संतापाची लाट! सहकार आयुक्तांना निवेदन

सहकारी पतसंस्थांच्या (बिगर शेती) पिग्मी एजंटांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये शासनाने ४% वरून थेट २.५% अशी मोठी कपात केल्यामुळे लाखांदूर तालुक्यातील पिग्मी एजंटांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. शासनाचा हा निर्णय अत्यंत अन्यायकारक असून यामुळे एजंटांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होणार आहे. या जाचक अटी तातडीने रद्द करून पूर्ववत ४% कमिशन लागू करावे, या मागणीसाठी लाखांदूर येथील पतसंस्थांच्या पिग्मी…

Read More

PM सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर:PM सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर; 4,700 घरांवर बसवले

छतावर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून घरगुती ग्राहकांचे वीजबिल शून्य करण्याच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत २९ मे रोजी देशात आतापर्यंतचे एका दिवसातील सर्वाधिक १५ हजार घरांवर प्रकल्प बसविण्यात आले असून त्यापैकी ४,७०० घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसवून महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळविला. या यशाबद्दल केंद्रीय नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी यांनी महाराष्ट्राचे अभिनंदन केले असून राज्याने ६ लाखापेक्षा…

Read More

शिवसेनेला जेमतेम 4 जागा, त्यातही बंडखोरी:मंत्री गुलाबराव पाटलांची भाजपवर नाराजी; दुपारपर्यंत बंड थंड करण्याचे भाजपचे आश्वासन

विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीतील धुसफूस थांबण्याचे नाव घेत नाहीये. अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर झाली असली, तरी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मात्र भाजप नेत्यांकडून शिवसेनेच्या जागांवर होणाऱ्या बंडखोरीवरून आक्रमक पवित्रा घेत भाजपला सुनावले आहे. “आम्ही गुवाहाटीला जाऊन उठाव केला नसता, तर आज काय स्थिती असती?” असा संतप्त सवाल गुलाबराव पाटील यांनी भाजपला…

Read More

पोलिसांना गुंगारा देणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

घातक शस्त्रांचा वापर करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आणि सराईत गुन्हेगार सुभाष कोंडीबा चौधरी (रा. चौधरी मळा, काष्टी, ता. श्रीगोंदे) याला अखेर श्रीगोंदे पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत फरार होता. श्रीगोंदे पोलीस ठाण्यात २८ फेब्रुवारी २०२६ रोजी दाखल झालेल्या एका गंभीर गुन्ह्यापासून सुभाष चौधरी अटक…

Read More