Headlines

अमरावती जिल्ह्यात सूर्यफूलाचे दिसणारे ताटवे आता दुर्मिळ:सोयाबीनच्या वाढत्या पेरणीमुळे घटले उत्पादन

अमरावती जिल्ह्यात सूर्यफुलाची लागवड मोठ्या प्रमाणात घटली आहे, ज्यामुळे एकेकाळी शेतात दिसणारे सूर्यफुलाचे ताटवे आता दुर्मिळ झाले आहेत. सोयाबीनला वाढती मागणी मिळाल्याने शेतकऱ्यांनी सूर्यफुलाकडे दुर्लक्ष केले आहे. जुने जाणते शेतकरी सांगतात की, सूर्यफूल हे हलक्या आणि मध्यम प्रतीच्या जमिनीत घेतले जाणारे पीक होते. कमी पाणी, कमी खर्च आणि कमी कालावधीत हे पीक एकरी सात ते…

Read More

नागपूर कृषी उत्पन्न समितीला 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' चा दर्जा:पणन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 'हायपावर कमिटी' स्थापन, राज्य सरकारची अधिसूचना जारी

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला ‘राष्ट्रीय महत्त्वाचा बाजाराचा ‘ दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली. चार लाख मेट्रिक टन मालाची वार्षिक उलाढालीसह देशातील अकरा राज्यांतून या ठिकाणी मालाची आवक होते, या हा निर्णय होण्यासाठी जमेच्या बाजू आहेत. विदर्भाच्या आर्थिक आणि कृषी क्षेत्राच्या विस्तारासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आणि महसूलमंत्री तथा…

Read More

सातारा झेडपीत तडीपार गुंडाच्या उपस्थिती बर्थडे पार्टी:सभापतींनी स्वतःच्या केबिनमध्ये कापला केक, फोटो व्हायरल झाल्याने खळबळ

सातारा जिल्हा परिषदेत तडीपार गुंडाच्या उपस्थितीत बर्थडे पार्टी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजकल्याण समितीचे सभापती ऋषिकेश धायगुडे यांनी आपल्या केबिनमध्ये तडीपार गुंडाच्या उपस्थितीत मित्राच्या वाढदिवसाचा केक कापल्याने जिल्हा परिषदेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तडीपार गुंड खुलेआम फिरत असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहे. सातारा जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेवेळी झालेल्या राड्याची चर्चा…

Read More

धनादेशात खाडाखोड, 5 लाखांचे 2.51 कोटी केले:मैसूरच्या जमीन दलालाला पुणे न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली

पुण्यातील मंगळवार पेठ येथील जमीन व्यवहाराशी संबंधित २० वर्षे जुन्या फसवणूक आणि बनावटगिरी प्रकरणात पुणे न्यायालयाने मैसूर येथील ६१ वर्षीय जमीन दलाल रामजनम बनवारी याला दोषी ठरवले आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन.एस. बारी यांनी बनवारी याला भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४०६, ४६५, ४६७ आणि ४६८ अंतर्गत दोषी ठरवून दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली….

Read More

कामगारांच्या धोरणात्मक आणि कायदेशीर मागण्यांवर शासन सकारात्मक:मंत्री आकाश फुंडकर यांची 'सिटू' संघटनेसोबत महत्त्वपूर्ण बैठक

राज्यातील कामगारांच्या विविध प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सिटू) संघटनेच्या प्रतिनिधींसमावेत मंत्रालयातील दालनात बैठक पार पडली. या बैठकीत कंत्राटी, बांधकाम, घरकामगार, अंगणवाडी व आशा कर्मचाऱ्यांसह विविध घटकांच्या प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस संघटनेचे प्रतिनिधी आबासाहेब चौगुले, धर्मा कांबळे, अशोक थोरात,…

Read More

रायगड किल्ला विकासकामांचा आशिष शेलार यांनी घेतला आढावा:सर्व विभागांना संयुक्त स्थळ पाहणीचे निर्देश, संवर्धन कामांना गती देण्याच्या सूचना

रायगड किल्ला परिसरातील विकासकामे, जनसुविधा, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा तसेच रायगड विकास प्राधिकरणाच्या कार्यप्रणालीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी संयुक्त स्थळ पाहणी करावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले. रायगड किल्ला विकास पर्यटन आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा मंत्री ॲड.शेलार यांनी मंत्रालयात आढावा घेतला. यावेळी दूरदृष्य प्रणालीद्वारे रायगड किल्ला विकास प्राधिकरणाचे…

Read More

सामाजिक न्याय, आदिवासी विकास विभागातून 7 हजार कोटी रूपये वळवले:महायुतीचे नव्हे तर महाफसवणुकीचे सरकार – सुनील माने

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते सुनील माने यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका केली आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेतून ८१ लाख महिलांना अपात्र ठरवून वगळण्यात आले असून, सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागांचे सात हजार कोटी रुपये या योजनेसाठी वळवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. हे सरकार ‘महायुतीचे नव्हे, तर महाफसवणुकीचे’ असल्याचा दावा…

Read More

शक्तीपीठ महामार्गाविरोधात माढ्यात मोर्चा:मुख्यमंत्र्यांना आषाढीची महापूजा करू देणार नाही, शेतकऱ्यांचा थेट इशारा

राज्यात प्रस्तावित असलेल्या बहुचर्चित ‘शक्तीपीठ महामार्गा’ला सोलापूर जिल्ह्यातून आता टोकाचा विरोध सुरू झाला आहे. माढा आणि पंढरपूर तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी या प्रकल्पाविरोधात एल्गार पुकारला असून, आज माढ्यात भव्य मोर्चा काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. “जर बळजबरीने जमिनी संपादन करून आमच्या सुपीक बागा उध्वस्त केल्या, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा करू देणार नाही,” असा…

Read More

व्यापारात सेवाभाव महत्त्वाचा- डॉ. माशेलकर:स्टेशनरी असोसिएशनतर्फे व्यापारी एकता दिनानिमित्त पुरस्कार प्रदान

व्यापार करताना केवळ आर्थिक नफ्यावर लक्ष केंद्रित न करता समाजाप्रती सेवाभाव जपणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. स्टेशनरी, कटलरी अँड जनरल मर्चंट असोसिएशनच्या वतीने आयोजित व्यापारी एकता दिनानिमित्त वार्षिक पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. डॉ. माशेलकर म्हणाले की, प्रत्येकाने भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगणे आवश्यक आहे. गुणवत्ता, सचोटी व प्रामाणिकपणाच्या बळावर…

Read More

परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणूक:शिंदेसेनेकडून सईद खानच्या उमेदवारी वरून ठाकरे गटाच्या आयोध्या पौळ यांची टिका

परभणी- हिंगोली विधान परिषद निवडणुकीत शिंदेसेनेकडून सईदखान यांना उमेदवारी दिल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांनी फेसबुकवरून महायुतीच्या नेत्यांवर जहरी टिका केली. आमदार चित्रा वाघ व राणेंच्या मुलांनी तसेच महायुतीच्या नेत्यांनी उत्तर देण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. परभणी –हिंगोली विधान परिषद निवडणुकीत उबाठा विरुध्द शिंदेसेना असाच सामना रंगणार असल्याचे चित्र आहे. दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी…

Read More