Headlines

कर्ज प्रकरणात शेतकऱ्यांना बँकांनी सिबिल सक्ती अद्याप तरी करू नये:तिवसा तालुक्यात शेतकरी आक्रमक, विविध 15 मागण्यांसाठी निवेदन‎

आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित व न्याय मागण्यांकडे प्रशासनाचे काटेकोरपणे लक्ष वेधण्यासाठी तिवसा तालुक्यातील समस्त शेतकरी बांधव आणि शेतकरी पुत्रांच्या वतीने मंगळवार २ जून रोजी तहसीलदारांना निवेदन साद . तिवसा नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते अनिल थुल आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांसह हे निवेदन प्रशासनाला सोपवण्यात आले….

Read More

अधिकमासानिमित्त तिर्थाटन:प्रवाशांची गर्दी वाढली; रेल्वेत आरक्षण मिळेना,एसटीतही गर्दी वाढली, महिलांना 50 टक्के सवलतीने संख्या जास्त‎

उन्हाळ्यात बहुतेक जण पर्यटनासाठी जात असल्याने रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळत नाही. त्यातच अधिक मासानिमित्त (पुरुषोत्तम मास) तिर्थाटनाला जाणाऱ्यांचीही भर पडल्यामुळे रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळेनासे झाले आहे. सामान्य श्रेणीत तर पाय ठेवायलाही जागा मिळणार नाही, अशी प्रचंड गर्दी आहे. अशा प्रवासात गैरसोय होत असली तरी प्रवासी एका रात्रीचा त्रास आहे, असे म्हणत अगदी सहज ती सहन…

Read More

31 लाखाहून अधिक भक्तांनी घेतला महाप्रसाद:उन्हाळी सुट्ट्यांसह विविध सण-उत्सवांच्या मुहूर्तावर अन्नछत्र परिसर भाविकांनी फुलला‎

येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून भक्तांच्या होणाऱ्या गर्दीकरिता केलेल्या उपाययोजना ह्या उल्लेखनीय व्यवस्थेमुळे भक्तातून समाधान व्यक्त होत असून, यामध्ये सुसज्ज वाहनतळ, महाप्रसाद रांग, भक्तांना राहण्याची उत्तम सुविधा, ऑनलाईन महाप्रसाद सेवा या . १ मे महाराष्ट्र दिन, बुद्ध पौर्णिमा, अंगारक चतुर्थी, वैशाख अपरा एकादशी, ज्येष्ठ शुध्द कमला एकादशी, अमावस्या, अधिक मास, गुरुपुष्यामृत, अधिक मास पोर्णिमा,…

Read More

प्री-सुब्रतो फुटबॉल स्पर्धेत कोपरगावचे खेळाडू चमकले:संजीवनी अकॅडमीची क्रीडा क्षेत्रातही आघाडी कायम, स्पर्धेत उपविजेतेपदावर मारली बाजी‎

कोपरगाव संजीवनी अकॅडमीच्या १७ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल संघाने “साऊथ झोन (सेकंड) सीबीएसई प्री-सुब्रतो कप फुटबॉल स्पर्धा २०२६’ मध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्य पदकावर आपले नाव कोरले. दक्षिण विभागातील केरळ, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या चा . साखळी फेरीत संजीवनी संघाने सेंट्रल रेल्वे स्कूल, कल्याणचा २-० असा पराभव करून विजयी सुरुवात केली. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत…

Read More

आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजात तेढ निर्माण करण्याचे सरकारचे कारस्थान:एससी उपवर्गीकरणाविरुद्ध राज्यव्यापी लाँग मार्च; 15 ला शहरात सभा‎

महाराष्ट्र सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावरून विविध समाजघटकांमध्ये तेढ निर्माण करून त्यांना एकमेकांविरुद्ध उभे करण्याचे षडयंत्र राबवत आहे. मूळ प्रश्‍नांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी जाती-जातींमध्ये संघर्ष लावला जात आहे, असा आरोप अनुसूचित जाती उपवर् . अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी १० जूनपासून बीड येथून निघणारा राज्यव्यापी लाँग मार्च १५ जून रोजी अहिल्यानगर शहरात येत आहे. या…

Read More

रोटेगाव एमआयडीसीत भूखंडासाठी नोंदणी सुरू‎:आचारसंहितेनंतर रस्ते, प्लॉटिंग आणि उद्योग उभारणीच्या कामांना येणार वेग‎

तब्बल ३२ वर्षांपासून रखडलेली रोटेगाव औद्योगिक वसाहत आता प्रत्यक्षात साकारण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. रोटेगाव, जरुळ, आघुर आणि लोणी या चार गावांतील सुमारे ११७० एकर जमिनीवर उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी एमआयडीसीने नवीन फलक उभारले असून, भूखंडांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेलाही सुरुवात केली आहे. विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे पुढील प्रक्रिया तात्पुरती थांबली असली तरी ती संपताच रस्ते, प्लॉटिंग आणि…

Read More

अवैध गॅस सिलिंडर वाहतुकीवर कारवाई:5.92 लाखांचा मुद्देमाल जप्त; जायखेडा पाेलिसांत एका संशयितावर गुन्हा दाखल‎

जायखेडा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत अवैधरित्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची वाहतूक करणारे पिकअप वाहन पकडले. या कारवाईत वाहनासह सुमारे ५ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जायखेडा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सागर काळे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे अंतापूर चौफुली परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी…

Read More

काँग्रेस पक्षाच्यावतीने महागाईविरोधात कन्नड येथील तहसीलसमोर आंदोलन:नायब तहसीलदारांना दिले विविध मागण्यांचे निवेदन‎

विद्यमान सरकारकडे कोणतेही धोरण आणि नियोजन नसल्यामुळे सामान्य जनता महागाईच्या आगीत जळत आहे. मात्र, सत्ताधारी महागडी विमाने व गाड्यांतून प्रवास करीत असून दिवसेंदिवस महागाई वाढत असताना याबाबत कोणत्याही उपाययोजना हाती घेण्यात येत नाहीत. याबाबत रोष व्यक्त करीत काँग्रेस पक्षाच्या वतीने महागाईविरोधात कन्नड तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. माजी आमदार नामदेवराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन…

Read More

पोलिस आयुक्तांची फसवणूक करू पाहणारे तोतये ‘सीआयडीबी’ जेरबंद:तिघांना अटक, गळ्यातील आयकार्डच्या लेसमुळे आली शंका

“आम्ही सीआयडीबी टीमचे राष्ट्रीय अधिकारी आहोत. पोलिसांना क्लिष्ट प्रकरणांत मदत करू’ असे सांगत पोलिसांनाच फसवू पाहणाऱ्या एका महिलेसह तिघांना स्वत: पोलिस आयुक्तांनी गजाआड केले. विशेष म्हणजे, हे तोतये अधिकारी पोलिस आयुक्तांनाच भेटायला गेले होते. मात्र, आयुक्तांच्या तीक्ष्ण नजरेने त्यांची तोतयेगिरी उघड झाली. याप्रकरणी या तिघा तोतयांसह त्यांना पोलिसांसारखी बनावट ओळखपत्रे पुरवणाऱ्या दिल्ली-हरिद्वार येथील संस्थेच्या चालकाविरुद्ध…

Read More

अमरावती विधान परिषद:विप्लव बाजोरिया यांचा अर्ज बाद, संपत्तीच्या तपशिलातील त्रुटीमुळे निर्णय; हायकोर्टात आव्हान देणार

विधान परिषदेच्या अमरावती जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान बाद करण्यात आला आहे. संपत्तीच्या तपशिलातील त्रुटी आणि ते विशिष्ट फॉरमॅटमध्ये नसल्याच्या आक्षेपावरून हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला आपण उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे बाजोरिया यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासमोर…

Read More